श्रीकृष्ण जयंती-श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा-12

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 06:32:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "श्रीकृष्ण जयंती"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.

              गोकुळाष्टमी मेसेजेस मराठी (Gokulashtami Messages)--

       गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या निमित्ताने आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कृष्णभक्तांना पाठवा खास गोकुळाष्टमी मेसेजेस मराठी (Gokulashtami Messages)

=========================================
1. कृष्ण भक्तीच्या छायेत दुःखांना विसरा
सर्व मिळून प्रेम-भक्तीने हरीचे गुण गाऊया
सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

2. गोकुळमध्ये ज्याचा निवास
ज्याने गोपिकांसह रचला इतिहास
देवकी-यशोदा ज्याची आई
असा आहे आमचा कृष्णा
शुभ जन्माष्टमी

3. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
हे नाथ नारायण वासुदेव
जय श्री कृष्ण

4. चला मिळून सारे सजवूया नंदलाला
मिळून सारे गाऊया कृष्ण भजन
जो दाखवतो सर्वांना मार्ग
आणि हरतो सर्वांचे दुःख
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

5. नंदच्या घरी आला आनंदीआनंद
जेव्हा आला नंदच्या घरी गोपाळ कन्हैया
जय हो मुरलीधर गोपाळाची
जय हो कन्हैया लाल की
हॅपी जन्माष्टमी
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================