कविता-हा भिजवणारा ऋतू आहे गाढ प्रेमाचा, तुला मला प्रीतीत बांधणाऱ्या दृढ बंधनाचा

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 10:28:41 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातली एक अतिसुंदर प्रेम कविता-गीत ऐकवितो. "भीगा भीगा प्यार का समा, बता दे तुझे जाना है कहाँ बलिए"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही काल रात्रीपासून ते आतापर्यंत मुसळधार, धो धो पाऊस पडत असलेली, गार वाऱ्याने तुषार घरात घेऊन येणारी, आणि कालची श्रीकृष्ण जम्नाष्टमी आणि आजची दही-हंडी (गोपाळ-कIला), उत्सव खऱ्या अर्थाने गाजविणारी, गुरुवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( भीगा भीगा प्यार का समा, बता दे तुझे जाना है कहाँ बलिए )
---------------------------------------------------------------------       

   "हा भिजवणारा ऋतू आहे गाढ प्रेमाचा, तुला मला प्रीतीत बांधणाऱ्या दृढ बंधनाचा" 
  ----------------------------------------------------------------------

हा भिजवणारा ऋतू आहे गाढ प्रेमाचा
तुला मला प्रीतीत बांधणाऱ्या दृढ बंधनाचा
पावसाशिवाय दुसरा ऋतू असूच शकत नाही,
तोच मनात रुजवतोय अंकुर प्रीतीचा

हा भिजवणारा ऋतू आहे गाढ प्रेमाचा
तुला मला प्रीतीत बांधणाऱ्या दृढ बंधनाचा
चिंब भिजवतो तो, प्रेमाने न्हाऊ घालतो,
मित्रच असतो तो आपल्या प्रेमीजनांचा

तू मनी काय योजलंय, प्रियकरI, तू नेणार कुठे मला ?
तुझ्या मनाचा अंदाजच नाही येत, नुसतं पाहून तुला ?
तू नेशील तिथे मी येईन, माझा विश्वास आहे तुजवरी,
तू जाशील तिथे मी जाईन, निःसंशय, खात्रीच आहे तुझी मला

अगदी डोळे झाकूनही मी तुझ्याबरोबर येईन, मला भरोसा आहे
न विचारतIही तुझ्या पावलावर पाऊल टाकीन, तुझा हात हाती आहे
तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, मला ठाऊक आहे, मला माहित आहे,
विश्वासघात नाहीच कधी करणार तू, माझं मन तुला दिलं आहे

प्रेमाच्या वाटेवर काटे असतात पसरलेले, कधी ऐकलंय
ही वाट काट्याकुट्यांची असते, सोपी नसते, पुस्तकात वाचलंय
पण मला कसली भीती, माझा तुझ्या प्रेमावर विश्वास आहे,
तूच माझी दुनिया आहे, तूच माझं जीवन, तुझं प्रेम खरं आहे

जमाना कोसत असतो, प्रेम करणाऱ्यांवर, आकस धरत असतो
नीट जगू देत नाही, प्रेमही करू देत नाही, नावेच ठेवीत असतो
पण मला जमान्याची नाही पर्वा, माझ्याबरोबर तू आहेस, तुझं प्रेम आहे,
आता साऱ्या समाजाशीही लढेन मी, तुझ्या बाहूंचाच मला आधार आहे

तुझ्याबरॊबर जुळलेले हे घट्ट प्रेमाचे नाते अतूट आहे, अभंग आहे
ही आपल्या प्रेमाची तलम डोर, ना तुटेल, ना सुटेल, अति चिवट आहे
आपली प्रीतच अशी आहे, ती अशीच जुळली आहे, तुला मला कळली आहे,
आपल्या अंगांगात ती भिनली आहे, अंतर्मनात खोल रुजली आहे, रुळली आहे

आता पाठी वळून नकोस पाहू, प्रेमाच्या वाटेवर आपण चालत राहू
कितीही येवोत संकटे, कितीही घोंघावोत वादळे, आपण पुढेच जाऊ
ते ठिकाण पाठी राहिलंय, नजरेआड झालंय, नवीन मंजिल आपण पाहू,
आता थांबणे नाही, पावलांना अIराम नाही, आता त्यातिथेच विराम घेऊ

सर्व काही आपण त्यागलंय, आपलं घरदार आपण सोडलंय
आता नाती गोती नाहीच काही राहिली, सर्व आप्तांना बाजूला केलंय
या प्रेमाच्या खडतर पथावर फक्त तू आणि मी, तुझ्या पावलावर पाऊल ठेवलंय, 
पाठीपुढे ना पाहता, कशाचीही पर्वा न करता, तुला मी माझं सर्वस्व झोकून दिलंय

तू माझं शरीर आहेस,अंग आहेस, तूच  माझी कायI
मी तुझी सावली होईन, तुझ्या पाठीशी राहीन, मीच तुझी छाया
मी तुझी राधिका, मी तुझी प्रेमिका, मीच तुझी आहे सारिका,
तू माझा साजणा, तू माझा प्रियकर, मेहबुबा, दिलरुबा, तूच माझा सावरिया

हा भिजवणारा ऋतू आहे गाढ प्रेमाचा
तुला मला प्रीतीत बांधणाऱ्या दृढ बंधनाचा
आपली प्रीत आहे अगदी बालपणापासूनची,
तिला वाढवण्यात मोठा हात आहे या पावसाचा

हा भिजवणारा ऋतू आहे गाढ प्रेमाचा
तुला मला प्रीतीत बांधणाऱ्या दृढ बंधनाचा
तुझी माझी प्रीत दिवसेंदिवस वाढण्याचा,
प्रेमात नखशिखांत भिजण्याचा, मनमुराद आनंद घेण्याचा

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार.
=========================================