गोपाळ-कIला(दहीहंडी)-माहिती-5

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:10:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गोपाळकाला संपूर्ण माहिती. 

              दहीहंडी २०२३ – Dahi Handi 2023--

     यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण ०६ सप्टेंबर २०२३ या दिवशी साजरा केला जाणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात सप्टेंबर या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे.

              पूजा साहित्य –

     कृष्ण जन्माष्टमी नंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळी कृष्णाची पुन्हा पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. या पूजेसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे –

वाती, वस्त्र, फुले, ताम्हण, पळी, पंचपात्र, तेल, अबीर, तुळशी, चंदन, पंचामृत, विड्याची पाने, सुपारी, लाल वस्त्र, अक्षता, कापूर, धूप, अगरबत्ती, तुळशीची माळ, पुष्पहार, हळद, कुंकू, सुटे पैसे, तूप, दही, लाह्या, दूध, सुंठवडा इत्यादी वस्तूंचा पूजेत समावेश करावा.

           पूजा विधि (Puja Vidhi of Dahi handi Utsav Marathi) –

जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून, संपूर्ण घर स्वच्छ करून, स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे परिधान करावे.

सर्वप्रथम देवाची पूजा करून घेणे.

त्यानंतर कृष्णाची पूजा करताना निर्माल्य बाजूला काढून ठेवावे.

त्यानंतर कृष्णाला हळद, कुंकू, अक्षता वाहावी. तसेच फुले घालावीत.

पुष्पहार, तुळशीची माळ घालावी. त्यानंतर निरांजनाने ओवाळावे.

अगरबत्ती दाखवावी. तसेच धुपारती करावी.

देवाला पंचामृताचा आणि सुंठवड्याचा नैवेद्य दाखवावा.

त्यानंतर आरती म्हणावी. तसेच प्रार्थना करावी. या पूजेमध्ये आपल्याकडून काही राहिले असल्यास त्यासाठी देवाची क्षमा मागावी.

यानंतर घरातील पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवावा.

संध्याकाळी पुन्हा उत्तर पूजा करून काल्याचा नैवेद्य दाखवून तो सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटून कृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन करावे.

--by Team MarathiZatka
---------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================