गोपाळ-कIला(दहीहंडी)-दहीहंडी गाणे

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:14:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                  "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                                 ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया दहीहंडी गाणे. 

           दहीहंडी गाणे – Dahi handi marathi Song--

बोल बजरंग बली की जय
बोल बजरंग बली की जय
गोविंदा रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा

खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका
पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका
लाल लाल पागोटे गुलाबी शेला
चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
तुझ्या घरात नाही पाणी घागर, उताणी रे गोपाळा
तुझ्या घरात नाही पाणी घागर, उताणी रे गोपाळा
एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला

कर्नलच्या पोरी तुझं इथं काय काम गो
कर्नलच्या पोरी तुझं इथं काय काम गो
तुझी माझी कशी जमल जोडी, मला ठाऊक हाय गो
तुझी माझी कशी जमल जोडी, मला ठाऊक हाय गो
तुझी माझी नाही जमणार जोडी मला ठाऊक हाय रं,
अशी कशी राधाबाई आलीस नाक्यावर
अशी कशी राधाबाई आलीस नाक्यावर
पदर नाही खांद्यावर, हे तुझ्या पदर नाही खांद्यावर

दोन पैसे, दोन पैसे देतो तुला राधे देतो तुला
तुझ्या मडक्यातला लोणी दे गो या कृष्णाला
लोण्याचा भाव नाही ठाऊक तुला
नाही कृष्णा ठाऊक तुला
फुकटचा ताप नको या राधेला
अगं आज तुझी माझ्याशी गाठ
नको फिरवू तू पाठ, तुझा फोडीन मी माठ
लाल लाल पागोटे गुलाबी शेला
चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा

एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमालरेपुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमालरेपुरेवाला
डोईवर भुजा म्हणजे मडक तुरा
राधेच्या वाटे नको जाऊ चोरा

अरं जन्माला घातलंस, उघड्यावर टाकलंस
राजाला मिळतोय निवारा
ए निळू भाऊ, निळू भाऊ हो बाजूला
चल हो जा बाजूला
खुटाशी गोळी नाहीतर देईन तुला
अरे हट, अरे हट, नाही जमणार तुला
जमणार नाही तुला
फुकटचा ताप नको या बापाला,
जा, जा रं काका, फिरवू नको डोका
बघतोय या नाका
लाल लाल पागोटे गुलाबी शेला
चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा

एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
गोविंदा आला रे आला तो हमाल पुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमाल पुरेवाला
अरे बोल बजरंग बली की जय..

--by Team MarathiZatka
---------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================