गोपाळ-कIला(दहीहंडी)-माहिती-8

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:19:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गोपाळकाला संपूर्ण माहिती. 

             दहीहंडी उत्सवासंबंधीत नियम –

     दहीहंडी उत्सवामध्ये गोविंदा पथक आठ ते नऊ थर लावून हंडी फोडतात सर्वात वरच्या थरावर लहान मुलांना ठेवले जाते. त्यामुळे या गोविंदा पथकातील अनेक गोविंदा जखमी होत असतात. काहींचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यासाठी ठराविक असे नियम केले आहे ते खालील प्रमाणे –

सन २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकारने बारा वर्षाखालील मुलांना दहीहंडीमध्ये सहभागी होता येणार नाही असे जाहीर केले.

२०१७ मध्ये १४ वर्षाखालील मुलांना दहीहंडी मध्ये भाग घेण्याची परवानगी नाही. असा मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला.

त्यानंतर किमान १८ वर्षे वयाची अट घालून या दहीहंडीमध्ये मुलांना सहभागी करून घेतले.
ठराविक उंचीवर दहीहंडी बांधावी.

              गोपाळकाला पदार्थ--

काला –
एक कप जाडे पोहे, एक कप चुरमुरे, अर्धा कप काकडीच्या बारीक फोडी, पाव कप भाजके डाळ, पाव कप तळलेले शेंगदाणे, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून, कोथिंबीर, लिंबू रस अर्धा चमचा, किसलेले आले, मीठ एक चमचा, साखर दोन चमचे, बेदाणे, पाव कप डाळिंबाचे दाणे आणि पाव कप दही सगळे एकत्र करणे आणि कृष्णाला नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटणे.

सुंठवडा –
काजू, बदाम, पिस्ता आणि खोबरे यापासून बनवलेला पदार्थ म्हणजे सुंठवडा. स्वादिष्ट आणि गोड पदार्थ पौष्टिक असा आहे. गोकुळाष्टमीला मोठ्या प्रमाणात बनवला जातो आणि प्रसाद म्हणून वाटला जातो. यासाठी साधारणपणे २० मिनिटे लागतात. खोबरे, बदाम, काजू, खारीक, सुंठ पावडर, बडीशेप, खडीसाखर, मनुका, पिस्ता यापासून हा सुंठवडा तयार केला जातो. आणि तो गोपाळकाल्याच्या दिवशी सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटला जातो.

            गोपाळकाला माहिती मराठी प्रश्न –

--गोपाळकाला कधी आहे?
--०७ सप्टेंबर 2023 या दिवशी गोपाळकाला आहे.

--दहीहंडी उत्सव का साजरा केला जातो?
--कृष्णाला दही लोणी दूध हे पदार्थ खूप आवडायचे यासाठी तो गावातील घरांमध्ये चोरी करायचा या त्याच्या बाल वीलांची आठवण म्हणून आपण दहीहंडी साजरी करतो.

--दहीहंडीचे दुसरे नाव काय?
--दहीहंडी चे दुसरे नाव गोपाळकाला असे आहे.

--दहीहंडीला कोणते पदार्थ विशेष प्रसिद्ध आहेत?
--दहीहंडीला काला आणि सुंठवडा हे पदार्थ प्रसिद्ध आहेत.

             दहीहंडी माहिती मराठी निष्कर्ष –

     मित्रांनो, या लेखाद्वारे आम्ही गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी या सणाबाबत संपूर्ण माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला Dahi handi marathi हा लेख वाचून कसा वाटला? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

--by Team MarathiZatka
---------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================