गोपाळ-कIला(दहीहंडी)-निबंध-2

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:29:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया दहीहंडी वर्णनात्मक निबंध. 

     शेजारीच एक मंच बांधला गेला होता त्यावर मानाची ही दहीहंडी फोडणाऱ्या पथकासाठी एक मोठी ट्रॉफी आणि मानधन बक्षीस म्हणून ठेवले होते त्याचबरोबर अनेक मोठ्या अतिथीना ही त्या बक्षीसाचे वाटप करण्यासाठी आमंत्रित केले गेले होते.

     आता प्रतीक्षा होती ती फक्त हंडी फुटण्याची आणि तेवढ्यात मोठा गोंधळ ऐकू येतो व एक मोठी बस भरून एका प्रतिष्टीत गोविंदा पथकाचे अगदी दिमाखात आगमन झाले.

     बस दहीहंडीजवळ थांबताच त्यातून अनेक वेगवेगळ्या वयाचे गोविंदा पटापट बाहेर आले. त्यात काही वयस्कर लोक ही होते जे तरुण गोविंदाना मार्गदर्शन करीत होते तर काही लहान लहान मुले ही होती. काही क्षणातच त्या सर्व गोविंदानी एकमेकांना व्यवस्थित सांभाळीत मानवी मानोरा रचण्यास सुरु केली.

     एक एक करून सात थर लागले आणि शेवटच्या थरावर एक लहानगा गोविंदा सरसर चढत गेला. त्याने दहीहंडी फोडण्याआधीच तिला सलामी दिली व दहीहंडीला नमस्कार केला त्यावेळी त्याला सावरणारे खालील सहाही थर थोडेसे हलत होते व एकमेकांना सावरत असल्याचे आम्हाला दिसत होते.

     जसे त्या शेवटच्या थरावरील गोविंदाने हंडीला हात लावला तेव्हा खाली जमा असलेल्या प्रत्येक प्रेक्षकांचा जीव टांगणीला लागला होता. जमालेला प्रत्येक जण आपापल्या मोबाइलमध्ये दहीहंडी फुटत असतानाचा तो विलक्षण क्षण टिपण्यासाठी आतुर झाला होता. अनेक मोबाईल त्या क्षणाचे चित्रीकरण करण्यासाठी सज्ज्ज झाले होते आणि शेवटच्या थरावरील गोविंदाने क्षणार्धात दहीहंडी फोडली आणि आमचा परिसर टाळ्यांच्या कडकडाने भरून निघाला.

     जोरजोरात गाणी वाजू लागली आणि इतक्यातच पाचव्या थरावरील एका गोविंदाचा खाली उतरण्याआधीच चुकून मध्येच तोल गेला व तो खाली पडताना आम्हाला दिसला व आनंदाच्या वातावरणात जमलेल्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकला.

     काही वेळासाठी अगदी भयाण शांतता पसरली होती व आनंदाच्या हया क्षणाला कुठे तरी आता गालबोट तर लागणार नाही ना ह्याची काळजी सर्वाना लागली. लगेचच त्याच्याजवळ सारे जमा झाले होते आणि लांबून आम्हाला मात्र काहीच कळात नव्हते की नक्की काय झाले आहे.

     त्याला जास्त लागले तर नसेल ना हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतानाच अचानक पुन्हा सारे जण जोरजोरात नाचू लागले होते आणि मग बातमी आली की त्याला खाली असलेल्या त्याच्या इतर गोविंदा मित्रांनी झेलले होते. हे कळताच आजच्या आनंदात विरजण पडता पडता वाचले होते.

     त्यानंतर त्या सर्व गोविंदांवर जल्लोष आणि शुभेच्छाचा वर्षाव सूरु झाला होता. त्या गोविंदा पथकाला मानाने त्यांची विजयाची ट्रॉफी आणि मानधन देऊन गौरविण्यात आलेले होते.

     मानाची ही दहीहंडी फोडून व आपले बक्षीस घेऊन ते गोविंदा पथक आपल्या पुढील प्रवासासाठी निघून गेले व तेथे जमलेली अफाट गर्दी ही हळू हळू ओसरू लागली होती पण मला मात्र तेथून निघूच नये असे वाटते होते.

     आज मी पाहिलेल्या हया दहीहंडीमुळे मला एक गोष्ट हया सणामुळे शिकण्यास मिळाली ती म्हणजेच एकजूट व एकमेकावरील विश्वासावर आपण कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करू शकतो. आता मला प्रतीक्षा आहे ती म्हणजेच पुढील वर्षीच्या दहीहंडीची.

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-सोपेनिबंध.कॉम)
                        ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================