गोपाळ-कIला(दहीहंडी)-निबंध-3

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:30:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गोपाळकाला निबंध. 

=========================================
Table of Contents--   
गोपाळकाला निबंध मराठी Essay on Gopalkala in Marathi--
गोपाळकाला केव्हा साजरा केला जातो?
श्रीकृष्णाचा जन्म केव्हा झाला?
श्रीकृष्णाने गोपाळकाला कसा साजरा केला?
दहीहंडी (गोपाळकाला)कशी साजरी करावी?
=========================================

     श्रावण महिना आला, की गोविंदा आला रे आला या गाण्याने अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा सर्वांचा आवडता सण-उत्सव म्हणजेच गोपाळकाला येतो.

              गोपाळकाला केव्हा साजरा केला जातो?--

     गोपाळकाला हा श्रीकृष्ण  जयंतीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा एक महोत्सव आहे. या दिवशी ठिक ठिकाणी दहीहंडी टांगली जाते आणि बालगोपाळांची गोविंदा मंडळे त्याठिकाणी जाऊन मनोरे लावून दहीहंडी फोडतात आणि बक्षिसे मिळवतात. महाराष्ट्रात हा सण अतिशय सुंदर पद्धतीने साजरा केला जातो. तसा हा सण संपूर्ण भारतातही मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. परंतु महाराष्ट्रातील त्याचे स्वरूप जरा भिन्न आहे.

     कृष्णाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी जो दहीहंडीचा सण साजरा केला जातो, त्याला आपण गोपाळकाला असे म्हणतो. श्रीकृष्ण गोकुळात मोठा होत असतो. गोकुळवासीयांचा मुख्य व्यवसाय म्हणजे गाईंचे पालन आणि दूध दुभते इत्यादी पदार्थ यांचे विक्री करणे होय. त्यावेळची बाजारपेठ मथुरा होती. या ठिकाणी जाऊन गवळी आणि गवळणी दुधाचे तूप, लोणी असे पदार्थ विकत असत. त्यावरच त्यांचा चरितार्थ चालत असे.

--by Tukaram Gaykar
------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्कूलिंगटन.कॉम)
                       -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================