गोपाळ-कIला(दहीहंडी)-निबंध-5

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:33:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गोपाळकाला निबंध. 

     श्रीकृष्ण सांगतो की आता आपण हे सगळे पदार्थ एकत्र करून खाऊया. त्याचा काला करू खूप छान होईल. सर्व गोपाळ ऐकतात. आणि सगळ्या शिदोरीचा एकत्रित काला होतो. तो काला श्रीकृष्ण स्वतःच्या हाताने सर्वांना खायला देतो. त्याची चव अतिशय छान असते. हा काला खायला सर्वांना खूप आवडतो. स्वर्गातून देव पाहत असतात. त्यांना हे दृश्य फार आवडते. श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातचा काला खाण्याची इच्छा देवांना होते. सर्व देव यमुनेच्या पाण्यात माशांच्या रूपाने येतात.

     काला खाल्ल्यानंतर गोपाळ यमुनेवर हात धुण्यासाठी येतील. तेव्हा त्यांचे उष्टे आपण खाऊ अशी त्यांची कल्पना असते. परंतु श्रीकृष्ण हे जाणून असतात ते आपल्या सोबत्यांना आपले हात धुण्यासाठी यमुना नदीवर जाऊ देत नाहीत. त्यामुळे देव हिरमुसतात.

     सर्वांची शिदोरी एकत्र करून दुपारच्या वेळी दररोज गोपाळकाला करून श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी काल्याचा आनंद घेत असत.

     गोपाळकाला उत्सवामागे श्रीकृष्णाचे आपल्या सगळ्यांचा शिंक्यावरचे दूध दही चोरून खाणे आणि गाईमागे वनात गेल्यावर दुपारच्यावेळी गोपाळकाला करून खाणे ही कथा आहे.

     महाराष्ट्रात मुंबई पुणे इतर सर्व छोट्या-मोठ्या शहरांमध्ये दहीहंडीचा उत्सव अतिशय आनंदाने साजरा होतो. यानिमित्त दहीहंडी फोडण्याची स्पर्धा असते. खूप उंचावर दोरांचा वापर करून एका मडक्यात दहीकाला बनवून त्यावर एक नारळ ठेऊन बांधले जाते. सुंदर अशा फुलांच्या हारांनी दहीहंडी सजवलेली असते. गोविंदा मंडळे येतात. उंच-उंच मनोरे तयार करून दहीहंडी फोडतात. बक्षिसे मिळवतात.

         दहीहंडी (गोपाळकाला)कशी साजरी करावी?--

गोपाळकाला हा अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर खेळ आहे दहीहंडी फोडताना ती खूप उंचावर लावली जाते. दहीहंडीची उंची कमी असली पाहिजे.

दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा मंडळे मनोरे लावतात. परंतु बरेच त्यामधील गोविंदा खाली पडल्याने जखमी, जायबंदी होतात. काही जणांचा मृत्यू होतो. जन्माचे अपंगत्वही येते.

दहीहंडी फार उंचावर न लावता ती माफक उंचीवर ठेवून इतर काही देशी खेळांच्या स्पर्धा आयोजित करून शेवटी दहीहंडी फोडली तर सर्वांचा आनंद द्विगुणित होईल.

दहीहंडीच्या स्पर्धांचे वेळेस खूप मोठ्या आवाजात स्पीकर्स लावले जातात. स्पीकरचा आवाज जरा मर्यादित असला पाहिजे. त्यामुळे सर्व आबालवृद्धांना या खेळाचा आनंद घेता येईल.

दहीहंडीचा खेळ 15 वर्षाच्या पुढील पुरुषांसाठी असावा. लहान मुलांचा यामध्ये समावेश नसल्याने त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.

     याप्रसंगी श्रीकृष्ण चरित्रावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करावे.

     गोपाळकाला,दहीहंडी सर्वांनाच आवडते.म्हणून बालगोपाळांचा सण सुरक्षिततेबाबत काळजी घेत साजरा करावा.

--by Tukaram Gaykar
------------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्कूलिंगटन.कॉम)
                        -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================