गोपाळ-कIला(दहीहंडी)-दहीहंडी सणाची गIणी-5

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:47:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                                 ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया दहीहंडी सणाची गIणी. 

          Ya Varshachi Dahihandi lyrics in Marathi--

इला रे इला
आमच्या वेसावे गावचा गोविंदा इला

रे गोविंदा SS
अरे गोविंदा रे गोपाला
अरे गोविंदा रे गोपाला

आयला वेसावे गावाचा गोविंदा

या वर्साची दहीहंडी
या वर्साची दहीहंडी
आमचे पाटील गल्लीची
या वर्साची दहीहंडी
आमचे पाटील गल्लीची

नऊ वारसांनी हंडी आयली पाटील गल्लीची
नऊ वारसांनी हंडी आयली पाटील गल्लीची

श्रीहिंगला देवी प्रासादिक भजन मंडळ
हिंगला देवी प्रासादिक भजन मंडळ
पाटील गल्लीच

गोविंदा
या वर्साची दहीहंडी
आमचे पाटील गल्लीची
गोविंदा SS
नऊ वारसांनी हंडी आयली पाटील गल्लीची

आयला मायेचा मी ह्या हंडीला
आयला मायेचा मी ह्या हंडीला
गो बायली आमचे गल्ली ला
गो बायली आमचे गल्ली ला

केली सुरवात आम्ही थाटाची
केली सुरवात आम्ही थाटाची
हंडी निंगालू बायका पोरांची
हंडी निंगालू बायका पोरांची

त्याचे मंगूशी गल्ली गल्ली ला
त्याचे मंगूशी गल्ली गल्ली ला
लागले थाट करावला

या वर्साची दहीहंडी
आमचे पाटील गल्लीची
गोविंदा SS
नऊ वारसांनी हंडी आयली पाटील गल्लीची

पाटील गल्लीच्या तीन गल्लिनी
पाटील गल्लीच्या तीन गल्लिनी
गल्ल्या सजविल्या लाईट बत्त्यांनीं
गल्ल्या सजविल्या लाईट बत्त्यांनीं

देव सजविल्या थाटामाटानी
देव सजविल्या थाटामाटानी
शोभून दिशे ये नवरंगांनी
शोभून दिशे ये नवरंगांनी
हिंगला देवी पाटील गल्लीला
हिंगला देवी पाटील गल्लीला
हुबी हाय आमचे पाठीला
या वर्साची दहीहंडी
आमचे पाटील गल्लीची
गोविंदा SS
नऊ वारसांनी हंडी आयली पाटील गल्लीची

देवकीच्या तू आठव्या बाला
तिला दाविला गोकुलाला
तिला दाविला गोकुलाला
नंदा घरच्या कुलाच्या बाला
नंदा घरच्या कुलाच्या बाला
गेलं बालपन गोकुलाला

यशोदेच्या तान्या तू बाला
यशोदेच्या तान्या तू बाला

आज हाय गोपालकाला

या वर्साची दहीहंडी
आमचे पाटील गल्लीची
गोविंदा SS
नऊ वारसांनी हंडी आयली पाटील गल्लीची

गावानं हंड्या फोडावा निंगतील
गावानं हंड्या फोडावा निंगतील
भगवानदादा सारखे हालू नाचतील
भगवानदादा सारखे हालू नाचतील

हंड्या नाचत नाचत फोरतील
हंड्या नाचत नाचत फोरतील
मुखी गोविंदा गोपाला बोलतील
मुखी गोविंदा गोपाला बोलतील

आजचा दिस हाय सगळ्यान मोठा
मजा करा तेवरी थोरी

या वर्साची दहीहंडी
आमचे पाटील गल्लीची
गोविंदा SS
नऊ वारसांनी हंडी आयली पाटील गल्लीची

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला

गोपालकाला जोर झाला
गोपालकाला जोर झाला
गोविंदाने जोर केला
गोविंदाने जोर केला

गोविंदा आला रे आला
आमचे वेसावे गावचा आला
गोविंदा आला रे आला
आमचे पाटील गल्ली चा आला
आमचे वेसावे गावचा आला
आमचे पाटील गल्ली चा आला

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीगIणी.इन)
                        ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================