गोपाळ-कIला(दहीहंडी)-दहीहंडी सणाची गIणी-6

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:48:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                  "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                                 ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया दहीहंडी सणाची गIणी. 

         Nand Kishora Lyrics In Marathi – Maza Pati Karodpati--

कान्हा ओ कान्हा, कान्हा रे कान्हा

नंदकिशोरा, चित्तचकोरा
गोकुळतारा, मनमोहन तू
बावरी राधा मी बृजबाला
प्रेम रसाची ओढ जीवाला
कृष्ण कन्हैया अशी लाविसी तू
कृष्णा कृष्णा, हरे कृष्णा
राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा

वृंदावनी गोप-गौळणी
घेऊनिया धुंद रास खेळसी तू
पानांतुनी वेलीतुनी
बासुरीचे गोड छेडीसी तू
याच सुरांनी मोहुनी गेले
पाहुनी तुजला मी तुझी झाले
वेड मनाला असे लाविसी तू

राधा तुझी, मीरा तुझी
होईन मी श्याम तुझी दासी रे
प्रीती अशी, भक्ती अशी
लाभली ही आज मधुमासी रे
तूच मुकुंदा माधव माझा
मुग्ध मनाचा श्रीहारी राजा
लोचनी माझ्या असा राहसी तू

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीगIणी.इन)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================