गोपाळ-कIला(दहीहंडी)-दहीहंडी सणाची गIणी-8

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:50:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया दहीहंडी सणाची गIणी. 

           गोविंदा रे गोपाळा- Govinda Re Gopala Lyrics – Kanha--

कलयुग आले देवा हे भारी
कृष्णाची हंडी कंसाच्या दारी
गीता ही सांगून गेला जो सारी
त्याच्याच शपथेवर चाले ही चोरी
थांबवा हो आता चाळा
जीवाचा झाला काला
गोविंदा रे गोपाळा
फोडून माथा होईना जागा
कुठल्या थराला जाणार सांगा
भोळ्या जीवाला देऊन खांदा
हवेत मजले कशास बांधा
कान्हाच्या नावाने होऊन गोळा
थांबवा हा आता चाळा
देखवेना हो डोळा
गायी राखायाचा माझा देव भोळा
झाली कशी मेंढरं आजूबाजू गोळा
वाट दाखवाया आता ह्या गोकुळा
ये रे धावूनिया माझ्या घननीळा

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीगIणी.इन)
                        ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================