गोपाळ-कIला(दहीहंडी)-हार्दिक शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:55:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. 

      Dahi Handi Wishes 2023 | दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
लय झाली "दुनियादारी"
खूप बघितली "लय भारी"
आता फक्त आणि फक्त करायची..
दहीहंडीची तयारी..!

"हातात घेऊनी बासरी आला कृष्ण
थरावर थर रचून झाले मित्र सज्ज
मटकी फोडू, खाऊ लोणी
गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा"

गोविंदा आला रे आला..
दहीहंडीच्या
समस्त बाळ गोपाळांना
शुभेच्छा..!

विसरून सारे मतभेद,
लोभ अहंकार दूर सोडा..
सर्वधर्म समभाव मनात जागवून,
आपुलकीची दहीहंडी फोडा.
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे.
ज्या गोष्टीला लोक म्हणतात
" हे तुला कधीच जमणार नाही ।"
आंम्ही उंचावरून कोसळतो ते
फक्त पुन्हा उभं राहण्यासाठी
हाथी घोडा पालखी जय कन्हया लाल कि!
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

थराला या!
नाहीतर,
धरायला या!!
आपला समजून,
गोविंदाला या!!!
गोपालकालाच्या खूप खूप शुभेच्छा!
=========================================

--by MarathiVedaTeam
--------------------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवेदI.इन)
                         ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================