गोपाळ-कIला(दहीहंडी)-माहिती-14

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 06:08:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया दहीहंडी उत्सव माहिती. 

              दहीहंडी उत्सव 2023--

     आजच्या आर्टिकल मध्ये आपण "दहीहंडी उत्सव 2023" विषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी कृष्णजन्म म्हणजेच जन्माष्टमी नंतर (गोपाळकाला) दहीहंडी साजरा केली जाते. चला तर जाणून घेऊया दहीहंडी का साजरी केली जाते? या विषयी थोडीशी रंजक माहिती.

     जन्माष्टमी हा हिंदूंचा खूप मोठा आणि मुख्य सण आहे. जो जगभरात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि दहीहंडी हा भगवान कृष्णाच्या बालपणाचा एक भाग मानला जातो. दहीहंडी हा एक हिंदू सण आहे जो जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्सवात आणि उत्साहाने साजरा केला जातो.

     दहीहंडी उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्र आणि पश्चिम भारतातील इतर राज्यांमध्ये आयोजित केला जातो.

     दहीहंडी हा एक प्रसिद्ध सण आहे जो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोव्यात साजरा केला जातो आणि त्यात लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. लोक मोठ्या थाटामाटात हा सण साजरा करतात आणि दहीहंडीच्या विधीशिवाय हा उत्सव अपूर्ण असल्याची श्रद्धा आहे.

              दहीहंडी 2023: इतिहास--

     हिंदू धर्म ग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या बालपणा लोणी म्हणजेच मक्खन दही आणि दूध आवडत असे. श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसह शेजारी तसेच इतर गावकऱ्यांकडून हे लोणी चोरत असे त्यांच्या चोरीच्या सवयीची तक्रार करण्यासाठी गावकरी त्यांच्या आईकडे गेले तेव्हा कृष्णाच्या आईने गावकर्‍यांना सांगितले की त्यांनी बनवलेले लोणी हे एका मातीच्या भांड्यामध्ये ठेवून लपवावे त्यामुळे कृष्ण तिथे पोहोचू शकत नाही पण हा विचार कामी आला नाही कृष्ण आणि त्याच्या मित्रांनी हंडी पर्यंत पोहोचण्यासाठी मानवी पिरॅमिड बनवण्यास सुरुवात केली तेव्हापासून गावकरी त्याला 'मक्खन चोर' म्हणू लागले.

            दहीहंडी 2023: उत्सव--

     लोक दहीहंडीचे आयोजन करतात आणि उंचीवर ठेवलेले मातीचे भांडे फोडण्यासाठी मानवी पिरॅमिड बनवतात. लाखो भाविक दहीहंडी सहभागी होतात आणि त्यात फक्त मुलंच नाही तर मुलीही सहभागी होतात. दहीहंडी फोडताना लोक "हाती घोडा पालखी, जय कन्हैया लाल की" असे म्हणतात.

--by Shrikant
---------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इन्फॉर्मेशन मराठी.को.इन)
                 -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================