पावसाची प्रेम कविता-मनात माझ्या भरलीय तुझी प्रीत, धडकन माझी गातेय तुझे प्रेम-गीत

Started by Atul Kaviraje, September 08, 2023, 11:00:39 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातली मनIस भावणारी एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "इतने करीब आओ, ये हो हमारा हाल, धडकन जवाब दे, जब दिल करे सवाल"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही पावसाने विश्रांती घेतलेली, शीत पावन वाहत असलेली, मन उत्साही करणारी शुक्रवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( इतने करीब आओ, ये हो हमारा हाल, धडकन जवाब दे, जब दिल करे सवाल )
--------------------------------------------------------------------------   

          "मनात माझ्या भरलीय तुझी प्रीत, धडकन माझी गातेय तुझे प्रेम-गीत"
         ------------------------------------------------------------

मनात माझ्या भरलीय तुझी प्रीत
धडकन माझी गातेय तुझे प्रेम-गीत
तुला पाहील्यापासून माझा झालाय हा हाल,
बेहालच करून गेलास तू मला, मनमित

मनात माझ्या भरलीय तुझी प्रीत
धडकन माझी गातेय तुझे प्रेम-गीत
तुझ्या प्रेमात मी हरवलंय माझं भान,
तुझ्या प्रेमात पडल्यापासून मी राहिले नाही शुद्धीत

तू जवळ येताच, तुला समीप पाहताच, माझी सुध बुध हरपते
तुझ्या डोळ्यांत पाहताच, माझ्या शरीरात गोड धुंदी पाझरत जाते
तुझा एक स्पर्श मिळतI, धडधड माझी वाढत जाते, स्पंदनात पसरत जाते,
ही देहात पसरलेली नशI, प्रत्येक गात्रांतून तुझे प्रेम सांगत राहते

तुझं मन मग विचारत राहतं, तुझं मन मला सवाल करतं
प्रिये, आज झालंय काय तुला, तू अशी बेकाबू का ?
मग माझी ही अचानक वाढलेली धडकन जवाब देते,
हा तुझ्या प्रीतीचा, हा तुझ्या प्रेमाचा असर नाही का ?

प्रिया, आज मी माझ्या मस्तीतच चूर आहे, माझा आगळाच सूर आहे
हे चांदण्यासम रुपेरी, चंदेरी तनबदन, त्याचा आज वेगळाच नूर आहे
तुझ्या प्रीतीत मी आज नहातेय, माझ्या प्रेमाला आलेला हा पूर आहे,
आज ही तुझी प्रेमिका, तिला कशाचं नाहीय भान, ती तुझ्या प्रीतीत चूर आहे

माझी बेकरारी वाढत चाललीय, ही प्रेम-बिमारी तनुत पसरत चाललीय
लाईलाज असा हा माझा हा प्रेम-रोग, त्याची धग देहाला जाणवत चाललीय
श्वास माझा फुललाय, धडधड माझी वाढलीय, श्वासात जणू अंगारा भरलाय,
कायेत कंपन भरलंय, ओठ थरथरताहेत, शरीरात अग्नीचा तप्त लोळ पसरलाय

माझा प्रेम-ज्वर तूच बरा करशील, माझी ही प्रेम-बिमारी तूच दूर करशील
तूच आहेस माझा वैद्य, तूच आहेस माझा इलाज, तूच यावर औषध देशील
ही शरीरातील आग तूच विझवशील, हा पेटलेला वणवा तूच बुझवशील,
तुझा एकचं स्पर्श मला हवाय, ये मला मिठीत घे, तुझ्या मिठीची ऊब मला देशील ?

हे माझे थरथरणारे ओठ आधीच आहेत तृषार्त, कधीचे आहेत प्यासे
ही तहान काही आताची नाहीय, साऱ्या जन्माची आहे ती, प्यारे
महिताहे माझ्यासम तूही आहेस तृषित, तुलाही लागलीय प्रेमाची तृष्णा,
तुझी ही तृष्णा तृप्त कर, तू माझीही तहान भIगवं, ओठी लाव माझ्या ओठांचे मदभरे प्याले

माझी बेताबी आता वाढत चाललीय, तुला त्याची काहीच पर्वा नाहीय
मी बेकाबू झाले आहे, तुझं प्रेम मला हवंय, तुला काहीच कसं वाटतं नाहीय
माझ्या या बेकरारीचा तू काहीतरी खयाल कर, माझं मन बेभानच जणू झालंय,
तुही माझ्यापरीच आहे बेकरार, बेताब माझ्या प्रेमाला, ही प्रेम-आग दुतर्फा लागलीय

मनात माझ्या भरलीय तुझी प्रीत
धडकन माझी गातेय तुझे प्रेम-गीत
तूच लावलयस वेड मला प्रेमाचे,
तुझ्या प्रेम-धारांत चिंब भिजतेय मी नित 

मनात माझ्या भरलीय तुझी प्रीत
धडकन माझी गातेय तुझे प्रेम-गीत
तुझा प्रेम करण्याचा ढंग आहे काही औरच,
पूर्ण बदललीस तू आज प्रेमाची रीत

माझं हे मोहक रूप तू नीट पहा, माझे मादक लावण्य तू निरखून पहा
माझ्या अंगांगात एक अदा आहे, हुस्न कसं ठासून भरलंय पहा
आसमIची परी मी, अस्मानी हूर मी, सौंदर्याची जणू मी खाण, रूपाचा खजिना,
तस्वीरच रेखाटलीय, पुतळाच घडविलाय ईश्वराने, माझ्या रूपाचे दिदार तू कर ना !

तुला वाटतं नाही मला बाहूंत घ्यावं, मला मिठीत कैद करावं ?
तुला वाटतं नाही, माझ्या अधरांचे चुंबन घ्यावं, मधुरसाचं सेवन करावं ?
तुला वाटतं नाही, माझी धडकन मधुर गीत गातेय, तू तिचं संगीतही ऐकावं ?,
तुला वाटतं नाही, माझ्या प्रेमात तू भान विसरावं, इतकं तू माझ्यावर प्रेम करावं ?

माझ्या डोळ्यांत खोल बघ, नशाच नशI आहे पसरलेली, तुझ्या प्रेमाची
माझ्या नयनांत डोकावून पहा, धुंदीच आहे बरसलेली, तुझ्या प्रीतीची
माझी धुंदी मी तुला देईन, इतकं प्रेम मी तुला देईन, तू त्यात वाहून जाशील,
माझ्या प्रीतीचा जाम तुला पाजीन, हा प्रेम-प्याला तुझे मुखी लाव, तू त्याने बेहोषच होशील

तुझ्यावर मी इतकं प्रेम करीन, आजवर कुणीचं कुणावर केलं नसेल
तुझ्यावर मी इतकं प्रेम करीन, आपलं प्रेम एक मिसIलच बनेल
साऱ्या दुनियेला मी विसरून जाईन मी या प्रेमात, तुला मी शब्द देते,
तू नसशील, मीही नसेन, आपण दोघेही नसू, पण फक्त आपलं प्रेमचं शाश्वत असेल

सख्या, माझ्याकडे एक नजर तर टाक, मला प्रेमाने पहा
माझ्या या चंचल अदेकडे, नखऱ्याकडे, तू कौतुकाने पहा
पहा माझे हावभाव, पहा माझी मादक अंगडाई, माझा अंगविक्षेप,
ये, प्रेमाने तुझा हात माझ्या हाती दे, घेऊ नको तू आज कुठलाच आक्षेप

मनात माझ्या भरलीय तुझी प्रीत
धडकन माझी गातेय तुझे प्रेम-गीत
तूच होतास मला जवळचा, तूच होतास लाडका,
तुझ्यावरच मी होते आसक्त, आहे तुला का माहित ?

मनात माझ्या भरलीय तुझी प्रीत
धडकन माझी गातेय तुझे प्रेम-गीत
ही प्रीत अशीच राहू दे, हे प्रेम असंच टिकू दे,
आपल्या प्रीतीची ज्योत अखंड राहू दे तेवीत   

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.09.2023-शुक्रवार.
=========================================