प्रेम कविता-प्रेम बरसतंय चंदेरी चांदण्या राती, तुझी माझी फुलतेय रुपेरी प्रीती

Started by Atul Kaviraje, September 09, 2023, 12:06:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, मधू-मिलनाची एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "चांदनी रात है, प्यार की बरसात है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही तुरळक पाऊस पडणारी, मळभ दाटलेली, परंतु काहीशी उदास करणारी,                 शनिवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( चांदनी रात है, प्यार की बरसात है )
------------------------------------------------

            "प्रेम बरसतंय चंदेरी चांदण्या राती, तुझी माझी फुलतेय रुपेरी प्रीती"
          -----------------------------------------------------------

प्रेम बरसतंय चंदेरी चांदण्या राती
तुझी माझी फुलतेय रुपेरी प्रीती
तुझं माझं मन एक करतेय ही रात्र,
आणि जोडतेय मनIमनाच्या गोड नाती

प्रेम बरसतंय चंदेरी चांदण्या राती
तुझी माझी फुलतेय रुपेरी प्रीती
चंद्राचा रथ सजलाय, निघालाय पुनवेच्या रात्रीला,
सखी चांदणीचा हात आहे त्याच्या हाती

ही रात्र पूर्ण चंद्राची आहे, सख्या
ही रात्र तुझ्या माझ्या मिलनाची आहे, लाडक्या
ही रात्र तुला सर्वस्व अर्पण करण्याची आहे, साजणा,
ही रात्र तुझ्या माझ्या पूर्णत्त्वाची आहे, रमणा

चंदेरी प्रकाशात धरती शुभ्र उजळून निघालीय
रुपेरी रंगाने कशी सृष्टी रूपात रंगलीय
दुधाळ, सफेद, धवल रंगाची किनार क्षितिजी,
जणू कुणा चित्रकाराच्या तसबिरीसम रेखाटली गेलीय

हा निसर्ग पहा आपणास बोलावीत आहे
हा सागर किनारा आपणास हाक देत आहे
पूर्ण चंद्राचे पूर्ण बिंब पडलेल्या हेलकावणाऱ्या लाटांमध्ये,
तुझ्या माझ्या प्रीतीची गIज ऐकू येत आहे

शुभ्र चंद्राची धवल किरणे सृष्टीला न्हाऊ घालीत आहेत
या रात्रीला आलेली ही रुपेरी नव्हाळी चंद्र ढगाआडून पहIत आहे
या रातीचे सारे रूपच गेलेय बदलून, तिची रयाच गेलीय बदलून,
वाहणाऱ्या नदीचे उजळ, चमकते जळ खळखळत सांगत आहे

प्रेम बरसतंय चंदेरी चांदण्या राती
तुझी माझी फुलतेय रुपेरी प्रीती
कित्येक दिवसांनी हे क्षण माझ्या आलेत जीवनात,
हेच क्षण आणतील माझ्या जीवनात सुख-शांती

प्रेम बरसतंय चंदेरी चांदण्या राती
तुझी माझी फुलतेय रुपेरी प्रीती
तुझ्यासाठी उजळताहेत माझ्या नयनाच्या ज्योती,
आयुष्यभर प्रकाशूदे आपल्या प्रेमाच्या फुलवIती

साजणा, आज आपली ही मधुचंद्राची रात्र आलीय
आपल्यासाठी निसर्गाने चंद्र-किरणांची शेज सजवलीय
सृष्टीने रंगी बेरंगी कोवळ्या फुलांची बिछायत मांडलीय,
आपल्या धुंद फुंद प्रीतीने ती आणखीनच सुहानी झालीय

तो चंद्र ढगाआडून डोकावतोय, आपल्या शुभ्र किरणांची बरसात करतोय
धवल किरणांनी न्हाऊ घालत, जणू चंदेरी फुलांची उधळण करतोय
ही रात्रही सजलीय, नटलीय, नवं वधूसम तीही जणू मोहरलीय, 
आपल्या सुहाग रात्रीस आपणास हा निसर्ग अनोखा आहेर देतोय   

आज माझ्या पूर्ण शरीरभर आनंदाच्या लहरी उठताहेत
तुझ्या मिलनासाठी माझे रोम रोम उचंबळून येताहेत
हीच ती पहिली रात्र, हेच ते पहिले मीलन, तुझ्या माझ्या प्रीतीचे,
वर अंबरी चांदणे अधिकच लख्ख पसरतेय, उर्मी ओसंडून वाहताहेत 

मी आज स्वप्नांतच आहे जणू, साजणा मला जागे करू नकोस
मला हे स्वप्न आयुष्यभर जगू दे, मला जागवून तू ते मध्येच तोडू नकोस 
ही चांदणी रात्र कधीच ढळू नये, हा पौर्णिमेचा चंद्र कधीच अस्तास जाऊ नये,
तुझं प्रेम माझ्यावर सतत बरसत, पाझरत रहावे, त्यात तू खंड पIडू नकोस

प्रेम बरसतंय चंदेरी चांदण्या राती
तुझी माझी फुलतेय रुपेरी प्रीती
साजणा, तुझ्या कुशीत मला निज येतेय,
असाच घट्ट मिठीत घे मला एकांती

प्रेम बरसतंय चंदेरी चांदण्या राती
तुझी माझी फुलतेय रुपेरी प्रीती
तुझ्यासह माझा संसार सजIवा आयुष्यभर,
मी तुझी आहे नवं वधू, तू हो माझा पती

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2023-शनिवार.
=========================================