दिन-विशेष-लेख-ताजिकिस्तानचा स्वातंत्र्य दिन-A

Started by Atul Kaviraje, September 09, 2023, 05:02:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                   "दिन-विशेष-लेख"
                             "ताजिकिस्तानचा स्वातंत्र्य दिन"
                            ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-09.09.2023-शनिवार आहे.  0९ सप्टेंबर-हा दिवस "ताजिकिस्तानचा स्वातंत्र्य दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

             ताजिकिस्तान--

=========================================
राष्ट्रगीत: सुरूदी मिल्ली
राजधानी(व सर्वात मोठे शहर)-दुशान्बे
अधिकृत भाषा-ताजिक
राष्ट्रप्रमुख-एमोमाली राहमोन
पंतप्रधान-कोखिर रसुल्झोदा
स्वातंत्र्य दिवस   (सोव्हिएत संघापासून)-सप्टेंबर ९, इ.स. १९९१
क्षेत्रफळ एकूण-१,४३,१०० किमी२ (९५वा क्रमांक)
पाणी (%)-०.३
लोकसंख्या एकूण-७३,४९,१४५(१००वा क्रमांक)
घनता-४५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)एकूण-८.८०२ अब्ज अमेरिकन डॉलर (१३९वा क्रमांक)
वार्षिक दरडोई उत्पन्न-१,३८८ अमेरिकन डॉलर (१५९वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन-ताजिकिस्तानी सोमोनी (TJS)
आंतरराष्ट्रीय कालविभाग-यूटीसी+०५:००
आय.एस.ओ. ३१६६-१-TJ
आंतरजाल प्रत्यय-.tj
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक-९९२
=========================================

     ताजिकिस्तान, अधिकृत नाव ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक (मराठी लेखनभेद: ताजिकिस्तानाचे प्रजासत्ताक; ताजिक: Ҷумҳурии Тоҷикистон, चुम्हुरिये तॉचिकिस्तॉन ; फारसी: جمهوری تاجیکستان ; रशियन: Республика Таджикистан ;), हा मध्य आशियातील एक भूवेष्टित देश आहे. याच्या दक्षिणेस अफगाणिस्तान, पश्चिमेस उझबेकिस्तान, उत्तरेस किर्गिझस्तान व पूर्वेस चीन हे देश वसले आहेत. याच्या सीमा पाकिस्तानाच्या चित्रल आणि गिलगित-बाल्तिस्तान प्रदेशांपासून नजीक असून अफगाणिस्तानाच्या वाखान पट्ट्यामुळे त्या दुरावल्या आहेत.

     ताजिकिस्तानाची बहुसंख्य प्रजा फारसीभाषक ताजिक लोकांची आहे. सामाईक ऐतिहासिक वारशामुळे संस्कृती व राहणी यांबाबत अफगाणिस्तान व इराणातील लोकांशी त्यांचे पुष्कळ साम्य आहे. ऐतिहासिक काळात समानी साम्राज्याचा भाग असलेला हा देश इ.स.च्या २०व्या शतकात सोव्हिएत संघातील घटक प्रजासत्ताक बनला. ताजिक सोव्हिएत साम्यवादी गणराज्य असे तत्कालीन नाव असणारा ताजिकिस्तान इ.स. ११९१ साली सोव्हियत संघातून बाहेर पडून सार्वभौम झाला.

--विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
------------------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकिपीडिया.ऑर्ग)
                    ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2023-शनिवार.
=========================================