दिन-विशेष-लेख-ताजिकिस्तानचा स्वातंत्र्य दिन-C

Started by Atul Kaviraje, September 09, 2023, 05:07:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                              "ताजिकिस्तानचा स्वातंत्र्य दिन"
                             ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-09.09.2023-शनिवार आहे.  0९ सप्टेंबर-हा दिवस "ताजिकिस्तानचा स्वातंत्र्य दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

                        ताजिकिस्तान--

             ताजिकिस्तानातील पर्वतरांगा--

     मध्य आशियात वसलेला ताजिकिस्तान ३६° उ. ते ४१° उ. अक्षांशांदरम्यान आणि ६७° पू. ते ७५° पू. रेखांशांदरम्यान पसरला आहे. ताजिकिस्तानाचा निम्म्याहून अधिक भूभाग समुद्रसपाटीहून ३००० मी. उंचीवर असून तेथे पामीर पर्वतंरागांचा डोंगराळ मुलूख आहे. उत्तरेकडील फरगाना खोरे आणि दक्षिणेकडील कोफारनिहोन व वाख्श खोऱ्यांच्या प्रदेशातला भाग तुलनेने सखल आहे. तजिकिस्तनाच्या पर्वतीय भागात उगम पावणाऱ्या हिमनद्या अरल समुद्राचे प्रमुख जलस्रोत आहेत.

     जुलै, इ.स. २००९ च्या अंदाजानुसार ताजिकिस्तानची लोकसंख्या ७३,४९,१४५ आहे. ताजिकभाषक ताजिक लोक येथील मुख्य गट आहे तर रशियन आणि उझबेकांचीही संख्याही लक्षणीय आहे. येथील रशियन लोक आता पुन्हा रशियात परतत आहेत. इ.स. १९८९मध्ये ८.९% व्यक्ती रशियन होत्या. याशिवाय बादाख्शान प्रांतात पामिरी लोकांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे.

     अधिकृत रित्या ताजिकिस्तान प्रजासत्ताक असून येथे संसदेच्या आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होतात. मात्र सोव्हिएतोत्तर काळातील यादवी संपल्यानंतरच्या इ.स. १९९९ सालातल्या निवडणुकींपासून संसदेत कायम बहुमत राखलेल्या ताजिकिस्तानच्या जनता लोकशाही पक्षाने राजकारणावर सातत्याने पकड राखली आहे. इ.स. २००५ सालातल्या संसदीय निवडणुकींमध्ये अध्यक्ष एमॉम-अली राहमॉन याने निवडणूक प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याचे अनेक आरोप विरोधी राजकीय पक्ष आणि राजकीय निरीक्षकांकडून झाले. इ.स. २०१०मधील संसदीय निवडणुकींमध्ये ताजलोपला ४ जागा जिंकता आल्या नाहीत; तरीही एकंदरीत संसदेत ताजलोप सुरक्षित आधिक्य राखून होता. ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटी अँड को-ऑपरेशन इन युरोप या संघटनेच्या राजकीय निरीक्षकांनुसार इ.स. २०१०मधील निवडणुकी "लोकशाहीच्या किमान प्रमाणनिकषांपिकी काही निकषांमध्ये अनुत्तीर्ण ठरल्या". मात्र निवडणुकींत घडलेले गैरप्रकार क्षुल्लक होते व त्यांचा ताजिक लोकांच्या निवड-पसंतीवर काहीही दुष्परिणाम झाला नाही, असा पवित्रा शासनाने घेतला.

     ६ नोव्हेंबर, इ.स. २००६ रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकींवर "मुख्यप्रवाहातील" विरोधी राजकीय पक्षांनी बहिष्कार घातला होता. २३,००० सदस्यसंख्या असलेल्या इस्लामी प्रबोधन पक्षाने बहिष्कारात सहभाग घेतला.

               अर्थतंत्र--

     ताजिकिस्तान भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या घटक प्रजासत्ताकांमधील सर्वांत गरीब देश होता; तसेच सांप्रत काळीदेखील मध्य आशियातील सर्वाधिक गरीब देशांपैकी एक देश आहे. भ्रष्टाचार, आर्थिक सुधारणांमधील असमतोल व आर्थिक व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे या देशाची वर्तमानकालीन अर्थव्यवस्था नाजूक आहे. ॲल्युमिनियम, कापूस इत्यादी मालाची निर्यात व स्थलांतरित परदेशस्थ ताजिक कामगार-नोकरदारांनी पाठवलेले परदेशी वित्तप्रेषण यांवर देशाचा परकीय महसूल आधारलेला आहे. अ‍ॅल्युमिनियम-उत्पादनक्षेत्रात ताजिकिस्तान अ‍ॅल्युमिनियम कंपनी, अर्थात ताल्को, या शासकीय कंपनीचे वर्चस्व असून तिचे उत्पादनप्रकल्प मध्य आशियात व जगभरात सर्वांत मोठे आहेत. नोकरी-धंद्यासाठी परदेशी - व खासकरून रशियात - गेलेल्या स्थलांतरित परदेशस्थ ताजिक कामगार-नोकरदारांनी पाठवलेले परदेशी वित्तप्रेषण हा गरीबीची झळ सोसणाऱ्या ताजिकिस्तानातील लाखो लोकांच्या उत्पन्नाचा प्रमुख आधार बनला असून ते राष्ट्रीय सकल वार्षिक उत्पन्नाच्या ३६.२% हिश्श्याएवढ्या मोलाचे असल्याचा अंदाज आहे.

--विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
------------------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकिपीडिया.ऑर्ग)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2023-शनिवार.
=========================================