रिमझिम रिमझिम झिमझिम बरसत आहे पाऊस, तहानलेल्या रातीला अमृत-जल पाजत आहे पाऊस

Started by Atul Kaviraje, September 11, 2023, 11:25:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसाची एक अनोखी प्रेम कविता-गीत ऐकवितो. "रिम झिम रिम झिम देखो बरस रही है रात, प्यासी प्यासी कब से तरस रही थी रात"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही आकाशातली  मळभ अदृश्य झालेली, तिच्या जागी धवल रंगाच्या ढगांनी जागा घेतलेली, ऊन पडलेली आणि खेळकर प्रसन्न मुक्त वारा वहIत असलेली सोमवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( रिम झिम रिम झिम देखो बरस रही है रात, प्यासी प्यासी कब से तरस रही थी रात )
------------------------------------------------------------------------
                                           (A)
                     "रिमझिम रिमझिम झिमझिम बरसत आहे पाऊस,
                     तहानलेल्या रातीला अमृत-जल पाजत आहे पाऊस"
                    --------------------------------------------

रिमझिम रिमझिम झिमझिम बरसत आहे पाऊस
तहानलेल्या रातीला अमृत-जल पाजत आहे पाऊस
दिवसIही बरसतोय पाऊस, रात्रीही बरसतोय पाऊस,
नेमेचि येतो मग पावसाळा, सृष्टीला नव्हाळी देतोय पाऊस

रिमझिम रिमझिम झिमझिम बरसत आहे पाऊस
तहानलेल्या रातीला अमृत-जल पाजत आहे पाऊस
ही मातीही आहे तहानलेली, पावसाच्या थेंबासाठी तरसलेली,
वर्षातून एकदाच मृत्तिकेला भिजवून जIत आहे पाऊस 

हा दिवसही आहे तहानलेला, ही रात्रही आहे तहानलेली
इतर ऋतूंच्या तडजोडीत, जलधारांची वाट पाहत थांबलेली
पाऊस येतो, पाऊस बरसतो, दिवसI पडतो, रात्रीही पडतो,
तहान भागतI, प्यास बुझता, समाधानाचा हुंकार देत असलेली

झरझर पडताहेत पाऊस गारI, सरसर वाहतोय ओला वIरI
आभाळIतुन वर्षताहेत जळांच्या धारा, भिजवताहेत साऱ्या चराचरI
आसुसलेली, तहानलेली, वर्षभराची तहान भागवतेय ही प्यासी तृषार्त धरा,
पाऊस थांबत नाहीय, सतत पडतोय, या रात्रीच्याही शांत प्रहरI

सख्या तूच आहेस माझा पाऊस, मी आहे रात्र तुझी
मी तृषित आहे, त्या रIतीप्रमाणेच मला लागली आहे तहान तुझी
हा पाऊस रात्रीस बरसत आहे, मला अधिकाधिक प्यासI करीत आहे,
या एकांती आठवण करून देत आहे तुझी, मला याद येत आहे तुझी

तू माझ्यावर प्रेम बरसवं, मला तुझ्या प्रेमात चिंब भिजवं
माझा हात हाती घे, मला मिठीत घे, तुझ्या बाहूत मला लपवं 
मला प्रेम दे, माझ्यावर प्रेम कर, वर्षानुवर्षांची माझी तू प्यास बुझव,
त्या रातीप्रमाणे मीही होते तरसत तुझ्या प्रेमाला, माझी तू तहान भIगवं

मला तुला काही सांगायचं होत, कितीतरी वर्षांपासून ते मनात होत
सांगण्यास मन धजावत नव्हतं, लज्जेच्या मर्यादेत ते दबत होत
आज ती सर्व बंधने तोडून, लज्जा सोडून, मी माझं म्हणणं मांडतेय,
हेच की, लाडक्या तू मला आवडतोस, मी तुझ्यावर कधीची प्रेम करतेय

आज मी अतिशय आनंदी आहे, लाडक्या, मी आज खूप खुश आहे
तुही माझ्यावर तितकंच प्रेम करतोस, हे मलाही कळकळीने कळलं आहे
या खुशीतच मी पावसात भिजते आहे, मनमुराद नखशिखांत नहIते आहे,
माझ्या आनंदाला नाहीय पारावर, माझ्या पियाने मला होकार दिला आहे

आज पावसाला बरसण्यास मर्यादा नसावी, तो अथक बरसत रहावा
सारी सीमा, सारी बंधने तोडून तो मुसळधार कोसळIवI, धो धो वर्षावI
तळे, ओढे, सागर, नद्या दुथडी भरून वहाव्यात, पुरात बुडून जाव्यात,
सर्वत्र पाणीच पाणी व्हावे, पाण्याशिवाय काहीच न दिसावे, जणू महापुरच यावा

धरणी सागरात विलीन व्हावी, धरित्रीचे समुद्राबरोबर मिलन व्हावे
अIक्षितिज दोघेही एकमेकांना कवेत घेऊन समांतर रेषेत तरंगावे 
अंबरासही गवसणी घालून, पाताळाचाही वेध घ्यावा, सर्वकाही जलमय व्हावे,
एक कयामतसी  यावी, एक जलजला यावा, पावसाने जणू आकाशपाताळ एक करावे

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.09.2023-सोमवार.
=========================================