रिमझिम रिमझिम झिमझिम बरसत आहे पाऊस, तहानलेल्या रातीला अमृत-जल पाजत आहे पाऊस

Started by Atul Kaviraje, September 11, 2023, 11:30:28 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसाची एक अनोखी प्रेम कविता-गीत ऐकवितो. "रिम झिम रिम झिम देखो बरस रही है रात, प्यासी प्यासी कब से तरस रही थी रात"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही आकाशातली  मळभ अदृश्य झालेली, तिच्या जागी धवल रंगाच्या ढगांनी जागा घेतलेली, ऊन पडलेली आणि खेळकर प्रसन्न मुक्त वारा वहIत असलेली सोमवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( रिम झिम रिम झिम देखो बरस रही है रात, प्यासी प्यासी कब से तरस रही थी रात )
------------------------------------------------------------------------

                                           (B)
                    "रिमझिम रिमझिम झिमझिम बरसत आहे पाऊस,
                   तहानलेल्या रातीला अमृत-जल पाजत आहे पाऊस"
                  --------------------------------------------

तुझ्या माझ्या प्रेमातही असेच काहीसे घडावे, त्यात नवीन प्रकरण जोडावे
तुझ्या माझ्या प्रीतीचा अफसाना अमर्याद लिहिला जावा, त्याला तारतम्य नसावे
तुझ्या माझ्या प्रीतीची गझल मैफिलीत उमलत राहावी, तिला सप्तसुरांचे साज जडावे, 
असे आपले हे प्रेम या पावसात उतू जावे, ते बहरुन जावे, भरभरून वहावे

चल साजणा, मी आहेच तुझ्या पाठी, तू पुढे पुढे चाल, या पावसात
तो पाऊस आपल्यावर थेंबांची अक्षता उधळतोय, तुषारांची करतोय बरसात 
सोबत घेऊन वीज-ढगांची वऱ्हाडी-वाजंत्री, मंगलाष्टकांची करून सुरुवात,
माथ्यावर बरसून आशिष देतोय, स्वयं पाहतोय आपली ही अनोखी बारात

माझ्या डोळ्यातली रेखाटलेली तुझी स्वप्ने आज खरी होताहेत, जिवलगI
स्वप्नांत चितारलेली तुझी चित्रे, आज तुझ्या रूपे प्रकट होताहेत, दिलबरI
मनात वसलेली तुझी मूर्ती, आज जिवंत होऊन मजसमोर उभी आहे,
स्वप्नांची माझ्या आज होऊन पूर्ती, माझे प्रेम मूर्तिमंत साकार झाले आहे

तेव्हा तुझ्या आठवणीत मला गाणे स्फुरत होते, मी गीत गात होते
तेव्हा तुझ्या आठवणीत मी पुस्तक लिहीत होते, कथेत तुला पहIत होते
तू माझ्या गीतातील साज होतास, सूर होतास, आवाज होतास, ताल होतास,   
तू माझ्या कहाणीतील राजकुमार होतास, नायक होतास, प्रियकरही होतIस

आता ते गीत मी प्रत्यक्षात गात आहे, हा पाऊस गाण्याला संगीत देत आहे
आता ती कहाणी मी प्रत्यक्षात जगत आहे, तो अफसाना खरा होत आहे
ही रात्र सत्यात उतरत आहे, भिजतI भिजतI तो सारा आभास दूर होत आहे,
हा पाऊस बरसतI बरसतI, आपल्या प्रेमाची आपणास जाणीव करून देत आहे

आपलं जीवन घडविणारा हा पाऊस कधीच न थांबIवा, सतत पडत रहावा
तोच आपले जीवन आहे, तोच ईश्वर आहे, तोच खुदा आहे, त्याचा वरदहस्त माथी रहावा
त्याच्या जलधारांनी तृप्त करीत रहावा, त्याच्या अमृत थेंबांनी जीवनदान देत रहावा,
तुझ्या माझ्या मनात प्रीत रुजवीत रहावा, आकंठ, प्रीतीची तहान भागवत रहावा

रिमझिम रिमझिम झिमझिम बरसत आहे पाऊस
तहानलेल्या रातीला अमृत-जल पाजत आहे पाऊस
तृप्त तृप्त झालीय सारी श्रुष्टी, आनंदात डोलत आहे श्रुष्टी,
तिला जलIचे दान देऊन, खुशीत बोलत आहे पाऊस

रिमझिम रिमझिम झिमझिम बरसत आहे पाऊस
तहानलेल्या रातीला अमृत-जल पाजत आहे पाऊस
थकलेल्या नयनांना तकवI, ताजवI देऊन गेलाय हा पाऊस,
उदास, मरगळलेल्या मनाला उमंग, उल्हास, उधाण देऊन गेलाय हा पाऊस

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.09.2023-सोमवार.
=========================================