प्रेम म्हणजे काय असतं.???

Started by ns.maratha01, November 01, 2010, 10:26:38 AM

Previous topic - Next topic

ns.maratha01

प्रेम म्हणजे काय असतं.



जे नदीला समुद्राशी असतं,
चातकाला पावसाशी असतं,
टापोर्‍या दव बिंदूला गवताच्या पात्याशि असत.



प्रेम म्हणजे काय असतं.



जे चंद्राला चांदन्यांशी असत,
इंद्रधनुष्याला क्षीतिज्याशी असत,
सळसळणार्‍या वार्याला गर्जणार्‍या ढगांशी असत.



प्रेम म्हणजे काय असतं.



जे फुलपाखराला फुलाशि असतं,
काजव्याला घनदाट अंधाराशी असतं,
गुणगुणनार्‍या पतंगाला मीनमिनत्या दिव्याशी असतं.



प्रेम म्हणजे काय असतं.



जस सुखाला दुःखाशी असतं,
हसण्याला रडण्याशी असतं,
रात्रीच्या अंधाराला सकाळच्या उजेडाशी असतं.



प्रेम म्हणजे काय असतं.



जे हळूवार जपायाच असतं,
हृदयात साठवून ठेवायच असतं,
कितीही दुःख झाल तरी हसत जगायाच असतं,



प्रेम म्हणजे काय असतं.



जे फक्त शेवटपर्यंत...
तुझ्यात आणि माझ्यात असतं...

-
****नितेश सावंत****[/color]

santoshi.world