पावसाची प्रेम कविता-भेटलो आपण दोघे या पावसात, प्रेम फुलू लागलंय अजाणता मनामनात

Started by Atul Kaviraje, September 12, 2023, 11:05:31 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसाची प्रेम फुलवणारी एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "हम दोनो मिले अकेले मे, बरसात हो गयी, जिस बात से डरते थे, वो बात हो गयी "- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही पाऊस पूर्णपणे थांबलेली, तुरळक शुभ्र ढगांची रेलचेल असलेली, आणि स्वच्छ,साफ,नितळ,चमकदार,सोनेरी,सळसळता उत्साह देणारी आणि खेळकर, थंड वIरI वहIत असणारी, ताजा-तवाना करणारी, मंगळवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( हम दोनो मिले अकेले मे, बरसात हो गयी, जिस बात से डरते थे, वो बात हो गयी )
--------------------------------------------------------------------------

         "भेटलो आपण दोघे या पावसात, प्रेम फुलू लागलंय अजाणता मनामनात"
        --------------------------------------------------------------

भेटलो आपण दोघे या पावसात
प्रेम फुलू लागलंय अजाणता मनामनात
तो त्या दिवशी योगायोगच घडला जणू,
तुझी माझी भेट व्हायचीच होती या पावसात

भेटलो आपण दोघे या पावसात
प्रेम फुलू लागलंय अजाणता मनामनात
नजरानजर झाली, LOVE AT FIRST SITE झालं,
भानावर येताच कळलं, आपण दोघेही अडकलोय प्रेमात

त्या दिवशी पावसाचा जोर वाढला होता, तो अविरत पडत होता
तो कोसळत होता, झुलत झुलत झोकात तो धरेवर झुल्यासम आंदोळत होता
अन अवचित आपण दोघेही सामोरे आलो होतो, एकमेकांना पहIत होतो,
हाच तो क्षण, त्याच क्षणी भोवतालचे सारे जग आपण दोघेही विसरलो होतो 

आपल्या प्रेमाची ती सुरुवात होती, पावसाने आपल्या प्रीतीची रुजुवात केली होती
हा भिगI मोसम, हा ओला ऋतू, या प्रेम ऋतूने जणू आपणास गुंगीचं घातली होती
भानावर येताच जणू भासले, आपल्या दोघांची तर युगायुगाची ओळख होती,
पावसाचे होते फक्त निमित्त, तुझी माझी भेट ही इथेच अशीच व्हायची होती

हे सारं आताच का घडत होतं, मला काहीच उमजत नव्हतं
या सर्वांचा अर्थ काय, माझ्या आकलनाच्या पलीकडे गेलं होतं
अनोळखी आपण दोघे, या पावसात अचानकच भेटलो होतो,
ओळख ना पाळख आपली, आपलं एकमेकांशी असलेलं नातं उलगडू लागलं होतं

हे सारं प्रथमच घडत होतं, ही प्रेम-रुत प्रथमच नजरेस अIली होती
बरसत बरसत ती प्रेमIचI धडा, प्रीतीचा पाठ आपल्याला शिकवीत होती
हा भिगI मोसम बहरुन येत होता, प्रेमाचे बीज मनात रुजवित होता,
हा प्रेमाचा ऋतू प्रेमांकुर मनात उमलीत होता, मनाला धुमारे देत पल्लवित होत होता

आभाळी ही घटI प्रथमच दाटून येत होती, आकाशास झाकोळून टाकीत होती
पर्जन्यरूपाने ती सरसर, झरझर, धरेवर वेगाने जळाची धार बरसवीत होती
त्या धारेत भिजून मन आणिक तृषित होत होत, तन बदन तप्त अग्नीत पोळत होतं,
हे सारं अकल्पनीय होतं, काय घडलं, आणि काय घडणार होतं, मन व्यथित होत होतं

तुझी माझी तेव्हाच झाली होती नजरानजर, नयन आपसूकच झुकू लागले होते
एक अनकही वेदना, संवेदना, डोळ्यातून गात्रागात्रात, रोमारोमात प्रवाहत होती
अंधारलेल्या मनाच्या गाभाऱ्यात, जणू कुणीतरी लख्ख प्रकाश भरत होतं,
त्या प्रकIशात मन उजळत होतं, मनाला कसली तरी अनामिक जाणीव होऊ लागली होती

हा पाऊस बरसत बरसत, साऱ्या सृष्टीला धुंद डोलवत होता
हा पाऊस आपल्या जलधारांनी, पर्ण फुलांना, वृक्षराईला भिजवत होता
हा पाऊस निसर्गाला नवेपण देत होता, जीर्ण जुन्याला नव्हाळी आणत होता,
हा पाऊस तर जादूच करीत होता, जणू कुणी तो एक महान जादूगारचं होता

वातावरणाला एक अनोखी धुंदी येत होती, ही धुंदी पावसाने महकत होती
रातराणीचा सुवास दरवळत होता, ओला वIरI तो दूर दूर पसरवत होता
त्या सुगंधात मन कसं मदहोश होत होतं , बेहोशीचाच आलम जणू आला होता,
हा बोचरा वIरI, पावसाच्या असंख्य थेम्ब-सुया देहावर जणू टोचत होता, घाव देत होता

पण ही बोचरी जळजळ, ही तीक्ष्ण चुभन मला इजा करीत नव्हती
या झरत्या पावसात मी आभाळी हात उंचावून ते सारं सहत होती
काहीही म्हण प्रियकरI, मला या साऱ्याचा काहीच त्रास होत नव्हता,
या बरसत्या पावसात मी कितीतरी वेळ उभी होते, मला मजाच येत होती

आणि अश्यात तू मला भेटला होतास, तूही पावसात भिजत होतास
आणि मला अचानक जाणवलं, माझ्या स्वप्नातला राजकुमार तूच तर होतास
इतके दिवस तरसत होते मन, तुझ्यासाठी झुरत होते नयन, तू प्रत्यक्ष समक्ष होतास,
तूच माझं प्रेम होतास, तूच माझ्या मनी होतास, तूच माझी प्रीत होतास

भेटलो आपण दोघे या पावसात
प्रेम फुलू लागलंय अजाणता मनामनात
सारंच कसं विचित्र, अकल्पित वाटू लागलंय,
पण ते सारं घडलं होतं एकाच क्षणात

भेटलो आपण दोघे या पावसात
प्रेम फुलू लागलंय अजाणता मनामनात
कशी काय वाटली तुला माझी भेट, आवडली ना ?,
पाऊस पडतI पडतI पुटपुटत होता माझ्या कानात !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2023-मंगळवार.
=========================================