प्रेम कविता -प्रिये, तुझ्यासाठी बघ मी छत्री उघडलीय, मग तू का भिजत उभी राहिलीय?-A

Started by Atul Kaviraje, September 13, 2023, 10:47:40 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसाची छत्रीतल्या प्रेमाची एक खट्याळ, मिश्किल कविता-गीत ऐकवितो. "मेरी छतरी के नीचे आजा, क्यो भिगे रे तू खड़ी खड़ी"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही पाऊस थांबलेली, सुंदर, रम्य, उत्साहाने सळसळत असलेली, बुधवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( मेरी छतरी के नीचे आजा, क्यो भिगे रे तू खड़ी खड़ी )
---------------------------------------------------------------

      "प्रिये, तुझ्यासाठी बघ मी छत्री उघडलीय, मग तू का भिजत उभी राहिलीय ?"
     -------------------------------------------------------------------

प्रिये, तुझ्यासाठी बघ मी छत्री उघडलीय
मग तू का भिजत उभी राहिलीय ?
सर्दी, पडसे, तापाने आजारी पडायचंय का तुला ?,
माझ्या छत्रीत ये, छत्रीत तुझ्यास्तव मी जागा केलीय

प्रिये, तुझ्यासाठी बघ मी छत्री उघडलीय
मग तू का भिजत उभी राहिलीय ?
तुला भिजायला गम्मत वाटतेय बहुतेक पावसात,
म्हणून मुद्दामूनच तू छत्री घरीच विसरलीय

जवळ ये, लाडके माझ्या छत्रीत ये, थोडा आडोसा घे
या छत्रीप्रमाणेच माझे पहा दिलही आहे खुले
छत्रीप्रमाणेच तुला मी माझ्या मनात सामावून घेईन,
माझ्या मनाच्या खोल कप्प्यात मी तुला सुरक्षीत ठेवीन

आता आणिक आढेवेढे नको घेऊस, अशी दूर नको राहूस
पावसाचा जोर वाढत चाललाय, अशी चिंब भिजत नको राहूस
ही छत्रीही तुला बघ स्वतःच आमंत्रण देतेय, तुला बोलावतेय,
टप टप पडणाऱ्या टपोऱ्या गारांपासून तुला संरक्षण देतेय

पावसाने आज उच्छाद मांडलाय, अति उन्मादाने तो झरू लागलाय
तुझ्या मादक जवानीला, तारुण्याला तो आणिकच भिजवू लागलाय,
ही तुझी भिगी भिगी जवानी, मला वेड लावू पहात आहे,
हे तुझं भिजलेलं तारुण्य, चिंब लावण्य, मनात आग लावू पहात आहे

अनेक युवती दिसताहेत मला आज या पावसात भिजताना
सौंदर्याचा मळाच जणू बहरलIय इथे, नजर नाही टिकत एका स्थानI
पण तुझं रूप काही औरच भासतंय, तुझा सुरेख चेहरा मला आकर्षित करतोय,
शेवटी व्हायचं तेच होतंय, भिडताहेत तुझ्या नयनांशी माझे नयन

प्रिये, तुझ्यासाठी बघ मी छत्री उघडलीय
मग तू का भिजत उभी राहिलीय ?
तुझ्या मनात कुणी आणखी नाहीय ना ?,
माझी अपेक्षित नजर तू टाळू लागलीय

प्रिये, तुझ्यासाठी बघ मी छत्री उघडलीय
मग तू का भिजत उभी राहिलीय ?
मला तुझ्याबद्दल आस्था आहे, कळवळा आहे,
माझ्या शब्दांतून ती तुला नाही का कळलीय ?

पहा, थोड्याच काळासाठी सूर्य ढगाआडून डोकावतोय, डोके वर काढतोय
कृष्ण घनांना न जुमानता आपली कोवळी किरणे धरेवर शिंपडतोय 
अगं नाजूकI, किती नाजूक आहेस तू, पावसात भिजून तू आजारी पडशील,
तर मग या सूर्य किरणांना तुझी ही नरम कायI कितीशी जुमानील ?

पहा, त्या सूर्याचे मलूल ऊन तुझ्यावरही पडतेय, तुझ्या देहाला जIळतंय
मलमलीसम तुझी कायI, हे संथ ऊन सहन करील का, ती करपणार नाही का ?
मला भीती आहे की, हे ऊनही तुला असह्यचं होईल, तुझी कायI काळी होईल,
तुझी गोरी कायI क्षणार्धात रापून जाईल, तुझी उजळ कांती पाहता पाहता काळवंडून जाईल

म्हणून म्हटलं की तू माझ्या या छत्रीत ये, बिनधास्त ये, बिनघोर ये, बेधडक ये
ऊन पावसापासून माझी छत्री तुझं संरक्षण करणार आहे, तू तिचा आडोसा घे
छत्रीवत माझं प्रेमही तुला आसरा देईल, माझ्या प्रेमाच्या छत्र-छायेखाली तू ये,
आता संकोच नको करुस, माझं प्रेमचं तुला निवारा देईल, आश्रय देईल

तुझं भिजलेलं रूप कसं दमकतंय, तुझं चिंब सौंदर्य कसं चमकतंय
पावसाच्या पडणाऱ्या जलधारांत, तुषार बिंदूंनी ते कसं उजळतंय, लखलखतंय 
तू जणू मोत्यांची शुभ्र माळ, तू जणू हिऱ्यांचा धवल हार, तुझी काय प्रशंसा करू ?,
असं वाटतं तुला कायमचं जवळ करावं, तुला नेहमीच गळ्यात परिधान करावं

प्रिये, तुझ्यासाठी बघ मी छत्री उघडलीय
मग तू का भिजत उभी राहिलीय ?
अशी कोणती शिक्षा तू देत आहेस मजला,
माझ्याकडून काही चूक का झालीय ?

प्रिये, तुझ्यासाठी बघ मी छत्री उघडलीय
मग तू का भिजत उभी राहिलीय ?
असे प्रदर्शन नको करुस तुझ्या सौंदर्याचे,
निसर्गाने तुझ्यात रूपाची खाणंच ओतलीय

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.09.2023-बुधवार.
=========================================