प्रेम कविता -प्रिये, तुझ्यासाठी बघ मी छत्री उघडलीय, मग तू का भिजत उभी राहिलीय?-B

Started by Atul Kaviraje, September 13, 2023, 10:49:22 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसाची छत्रीतल्या प्रेमाची एक खट्याळ, मिश्किल कविता-गीत ऐकवितो. "मेरी छतरी के नीचे आजा, क्यो भिगे रे तू खड़ी खड़ी"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही पाऊस थांबलेली, सुंदर, रम्य, उत्साहाने सळसळत असलेली, बुधवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( मेरी छतरी के नीचे आजा, क्यो भिगे रे तू खड़ी खड़ी )
---------------------------------------------------------------

      "प्रिये, तुझ्यासाठी बघ मी छत्री उघडलीय, मग तू का भिजत उभी राहिलीय ?"
     -------------------------------------------------------------------

आता असं वाटतंय, या पावसाने पडतI पडतI तुझ्या पावलांना विळखा घातलाय
या पर्जन्य-लहरीत भिजलेल्या नागिणीने लहरत, मुरडत वळसा घेतलाय
सखे, तुझं लचकतं, मुरडतं अंग जणू सर्पिणीसम आळोखे पिळोखे देतंय,
तुझा पदन्यास एका कुशल नर्तिकेसम सळसळता, नवा नृत्य-प्रकार दाखवतोय

सखे, तू माझी नागीण आहेस, मी तुझा सपेरा होईन, गारुडी होईन
माझ्या गIरुडाने, तुला मी कह्यात आणीन, तुला मी काबूत ठेवीन
फक्त मलाच माहीताहे, सर्प वशीकरण, मोहिनी मंत्राचे उच्चारण,
तुला आयुष्यभरासाठी मग मी माझ्या प्रेमाच्या पोटलीत बंद करीन 

माझ्या सुस्वर पुंगीने मी तुला भ्रमित करेन, तुला अथक नाचवेन
माझ्या सप्तस्वर पुंगीने मी तुला मोहित करेन, तुला वश करेन
तू त्या तालावर, सुरावर नाचत राहशील, डोलत राहशील, सळसळत राहशील,
माझ्या प्रीत-पुंगीच्या मधुर नगम्याने तू माझ्याकडे खेचत येशील, ओढत येशील

कसला विचार करतेस तू प्रिये, इतकं मी तुला कळकळीने विनवतोय
कुठे लक्ष्य आहे तुझे सखे, इतकं मी तुला अजीजीने आर्जव करतोय
ये माझ्या छत्रीत ये, मी कधीचा उभा आहे, तुला भिजताना पाहतोय,
तुझे स्थान माझ्या हृदयात आहे, लाडके, छत्रीचे फक्त निमित्त तुला सांगतोय

प्रिये, तुझ्यासाठी बघ मी छत्री उघडलीय
मग तू का भिजत उभी राहिलीय ?
इतकी विनवणी करूनही तू अजूनी ठाम आहेस,
माझी मनोदशा तू अजूनही नाही जाणलीय ?

प्रिये, तुझ्यासाठी बघ मी छत्री उघडलीय
मग तू का भिजत उभी राहिलीय ?
तुला आता मी प्रेमाची कुठली भाषा सांगू ?
तुझी कोणती मनधरणी करायची बाकी राहिलीय ?

रब्बाने तुझ्यावर खैरातच केली आहे, तुला देणगीच देणगी दिली आहे
ईश्वराची तुजवर मेहेरनजर आहे, तुझ्यावर वरदानाची उधळण केली आहे
प्रत्यक्ष परमेश्वराची कलाकृती तू, त्याची सुंदर जडण-घडण तू, देवाचा वरदहस्त तुझ्यावर आहे, 
देवाचा थोडासा हात माझ्याही माथी आहे, त्याने मला तुझ्याकरिता निवडले आहे

तू त्या ईश्वराचा थोडासा तरी अंश मला दे, त्याचा आशिष  मला मिळू दे
तू त्या परमेश्वराचा भाग आहेस, माझ्या वाट्यास थोडा तरी भाग येऊ दे
तू थोडासा देशील, तर लाखोंनी मिळवशील, तो परमेश्वर पुष्कळ दयाळु आहे,
तू माझी हो, मला पूर्णत्त्वास ने, अपूर्णांक मिळून दोघांचा पूर्ण पूर्णांक होऊ दे

मी आहे एक प्रेम-भिक्षेकरी, तू तुझी थोडीशी प्रेम-भिक्षा माझ्या झोळीत टाक
तुझ्या प्रेमाचा थोडा वाटI, थोडासा भाग मला दानात देऊन टाक
तुझ्या प्रेमाची दौलत अपार आहे, ती कधीच आटणार नाही, वाटूनही संपणार नाही,
तुझं प्रेम अगाध आहे, तुझं प्रेम अमर्यादित आहे, या प्रेम-वेड्याची ऐक तू हाक

ये माझ्या मिठीत ये, केव्हाचे मी माझे बIहू पसरून उभा आहे
ये माझ्या छत्रीत ये, केव्हाची मी ही छत्री उघडून तुला सIमोरI आहे
आता संकोच कसला, मनामनाचे नाते तर केव्हाच जुळले आहे,
या बरसत्या प्रेम-रुतूने आपल्या मनात ते केव्हाच फुलवले आहे

प्रिये, तुझ्यासाठी बघ मी छत्री उघडलीय
मग तू का भिजत उभी राहिलीय ?
आता या छत्रीचा आणखी अवमान नको करुस,
बघ तुला पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ती कधीची तरसलीय 

प्रिये, तुझ्यासाठी बघ मी छत्री उघडलीय
मग तू का भिजत उभी राहिलीय ?
हा पाऊस आणि ही छत्री आपल्याला एक करतेय,
निःशंक हो, माझ्या प्रेमाची ग्वाही मी तुला दिलीय

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.09.2023-बुधवार.
=========================================