प्रेम कविता-तुझ्या नजरेतील प्रेम मी ओळखलंय,तुझ्या नजरेतून प्रीतीचे विश्व प्रकटलय

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 10:57:45 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातील नजरेतल्या प्रीतीची एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "एक नज़र में भी प्यार, होता है मैंने सुना हैं, दो बातों में भी इकरार, होता हैं मैंने सुना हैं"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही तुरळक पाऊस पडत असलेली, तनामनात उत्साह खेळवणारी, एक जादुई वातावरण निर्माण झालेली,  गुरुवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( एक नज़र में भी प्यार, होता है मैंने सुना हैं, दो बातों में भी इकरार, होता हैं मैंने सुना हैं )
--------------------------------------------------------------------------

                                              (A)
        "तुझ्या नजरेतील प्रेम मी ओळखलंय, तुझ्या नजरेतून प्रीतीचे विश्व प्रकटलंय"
       ----------------------------------------------------------------

तुझ्या नजरेतील प्रेम मी ओळखलंय
तुझ्या नजरेतून प्रीतीचे विश्व प्रकटलंय
प्रिये, प्रेम सांगण्यास शब्दांची काय गरज ?,
तुझ्या झुकत्या नजरेतून मला ते कळलंय

तुझ्या नजरेतील प्रेम मी ओळखलंय
तुझ्या नजरेतून प्रीतीचे विश्व प्रकटलंय
नि:शब्द, मूक, अबोल आहे तुझी प्रीत,
तुझ्या डोळ्यांत पाहता ते मला जाणवलंय

एका नजरेतच प्रेम होतंय, असं ऐकलं होतं
शब्दातून ते व्यक्त होतंय, हेही ऐकलं होतं
पण प्रिये, तुझ्या मनातील भाव मला तुझ्या नजरेतूनच कळलेत,
तुझ्या पुटपुटणाऱ्या ओठांतून ते सहज उमलून बाहेर आलेत

आज मी स्वतःला खूप भाग्यवान समजतोय
आज मी मला अतिशय नशीबवान समजतोय
तुझ्या नजरेने मला तुझा प्रेमी म्हणू वरलं,
तुझ्या डोळ्यातून माझ्याप्रती प्रेम-पुष्प फुलू लागलं

तुझ्या नजरेतील प्रेम मी ओळखलंय
तुझ्या नजरेतून प्रीतीचे विश्व प्रकटलंय
तुझी नजर कधीही झुकू देऊन नकोस,
तू मला तुझे प्रेम नजर केलंय, भेट दिलंय

तुझ्या नजरेतील प्रेम मी ओळखलंय
तुझ्या नजरेतून प्रीतीचे विश्व प्रकटलंय
अगदी खरंय , LOVE AT FIRST SITE झालंय, 
तुझ्यावर माझं प्रेम अगदी सहजच जडलंय

आज सारा समा रंगीन असा का भासू लागलाय ?
आज सारा जहाँ हसीन असा का वाटू लागलाय ?
ही जादू आहे का प्रेमाची, ही किमया आहे का प्रीतीची ?,
सारं सारं बदलल्यासारखं आज का दिसू लागलंय ?

प्रेमात पडल्यावर असंच होतं, मी कुठेतरी ऐकलं होतं
कुणीतरी एक आवडल्यावर असंच होतं, मी कुठेतरी वाचलं होतं
आज प्रत्यक्षात ते घडत आहे, तू माझ्या जीवनात अIली आहेस,
मी तुझ्या प्रेमात पडत आहे, तू मला प्रेमाची ग्वाहीच दिली आहेस

तुझ्यावर माझं प्रेम जडलंय हे दाखविण्यास आरसI का पाहिजे ?
तुझावर मी प्रेम करतोय, हे सांगण्यास कोणता दाखलI का पाहिजे ?
हे प्रेम असंच असतं, ते असंच होत असतं, हे कळण्यास ग्रह-कुंडलीची का गरज आहे ?,
प्रेम सांगून होत नसतं, ते नकळत होत असतं, हे समजावण्यास कुणा पंडिताची का आवश्यकता आहे ?

तुझ्या नजरेतील प्रेम मी ओळखलंय
तुझ्या नजरेतून प्रीतीचे विश्व प्रकटलंय
मनात गोड तरंग लहरू लागलेत माझ्या,
मधुर स्वरात मन धुंद गीत गाऊ लागलंय

तुझ्या नजरेतील प्रेम मी ओळखलंय
तुझ्या नजरेतून प्रीतीचे विश्व प्रकटलंय
तुझ्या नजरेने मनाच्या सुप्त तारा छेडल्या गेल्यात,
त्या सुस्वर तारेतून एक अवीट गझल झंकारलीय 

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================