प्रेम कविता-तुझ्या नजरेतील प्रेम मी ओळखलंय,तुझ्या नजरेतून प्रीतीचे विश्व प्रकटलय

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:01:35 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातील नजरेतल्या प्रीतीची एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "एक नज़र में भी प्यार, होता है मैंने सुना हैं, दो बातों में भी इकरार, होता हैं मैंने सुना हैं"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही तुरळक पाऊस पडत असलेली, तनामनात उत्साह खेळवणारी, एक जादुई वातावरण निर्माण झालेली,  गुरुवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( एक नज़र में भी प्यार, होता है मैंने सुना हैं, दो बातों में भी इकरार, होता हैं मैंने सुना हैं )
--------------------------------------------------------------------------

                                             (B)
        "तुझ्या नजरेतील प्रेम मी ओळखलंय, तुझ्या नजरेतून प्रीतीचे विश्व प्रकटलंय"
       ----------------------------------------------------------------

या दुनियेची चमक दमक केव्हापासून माझ्या नजरेत होती
अनेक चमकत्या चेहऱ्यावर माझी तेव्हापासून नजर होती
पण आज एक वेगळाच चेहरा माझ्या नजरेसमोर अवतीर्ण झाला होता,
मला, माझ्या श्वासाला, माझ्या अस्त्तित्वाला कुठेतरी भरकटत नेऊ लागला होता

ही नवी नजर मला खोल डोहात घेऊन जात होती, मला मोहात पIडत होती
या नजरेची जादू मला मोहिनी घालत होती, मला जणू वशच करीत होती
माझी धडकन अवचित तीव्र होत होती, हृदय-ठोक्यात परिवर्तन येऊ लागले होते,
ही नजर मला कुठेतरी खेचत होती, मंत्र-मुग्ध, माझी जणू तंद्रीच लागली होती

काहींच्या पाहण्यात, बघण्यात नशI आहे, मस्ती आहे, हे मी ऐकले होते
काहींच्या नजरेत, डोळ्यांत कैफ आहे, धुंदी आहे, हे मी वाचले होते
पण आज मी प्रत्यक्ष त्या नशील्या नजरेत कैद होत होतो, बंदिस्त होत होतो,
मोहिनी घातल्याप्रमाणे मी तिथे खेचला जात होतो, त्या नजरेचा गुलाम होत होतो

तुझ्या नजरेतील प्रेम मी ओळखलंय
तुझ्या नजरेतून प्रीतीचे विश्व प्रकटलंय
मिटल्या डोळ्याआड लपून राहिलेलं प्रेम,
तुझ्या उघड-मीट पापण्यांतून मला उमजलंय

तुझ्या नजरेतील प्रेम मी ओळखलंय
तुझ्या नजरेतून प्रीतीचे विश्व प्रकटलंय
तू जरी लपविण्याचा प्रयत्न केलास तरी,
तुझ्या देहबोलीतून मला ते सहजच समजलंय

हा वाहतI वIरI काही सांगत आहे, तो काहीतरी बोलत आहे
वाहतI वाहतI जणू तो मनाला मुक्तपणे ढगांमध्ये उडवून नेत आहे
धरित्रीशी नाते कायम ठेव, तो भिरभिरत वदत आहे, तुझं तेच स्थान आहे,
तिथेच तुझे प्रेम आहे, तिथेच तुला ते मिळेल, तो कानाशी कुजबुजत आहे

होय, मला आज मुक्त विहार करू दे, त्या आभाळी मला स्वैर संचार करू दे
माझं मन खुशीत उडतय, त्याला पंख जणू फुटलेत, मनाला मोकळे फिरू दे
माझ्या आनंदाला नाहीय आज पारावर, त्याला काहीही नाहीय कमी, तो कायम राहू दे,
हे तुझ्या प्रेमामुळे घडतंय प्रिये, याला कारण तुझं प्रेमच आहे, ते असंच मला मिळू दे

हे सर्व घडविणारी ही हवा नक्कीच बाधित नाही, ती पवित्र आहे
माझ्या मनIस उंच अंबरी विहरून आणणारा हा पवन शुद्ध आहे, पावन आहे
हा असर, हा परिणाम या हवेचाच आहे, या खेळकर, मुक्त, वाहत्या वाऱ्याचाच आहे,
हे मी केव्हातरी होतं ऐकलेलं, पण ते आज प्रत्यक्षच घडतं आहे, समक्ष होत आहे

तुझ्या नजरेतील प्रेम मी ओळखलंय
तुझ्या नजरेतून प्रीतीचे विश्व प्रकटलंय
तुझ्या प्रेमाने अनोखा रंग भरलIय जीवनात,
तुझं माझं कायमच गहिरं नातं जुळलंय

तुझ्या नजरेतील प्रेम मी ओळखलंय
तुझ्या नजरेतून प्रीतीचे विश्व प्रकटलंय
तुझं प्रेम मी आयुष्यभर जपेन, प्रिये,
भाव-विभोर मनाने माझ्या, तुला आश्वासन दिलंय

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================