शल्य

Started by sulabhasabnis@gmail.com, November 02, 2010, 12:27:16 AM

Previous topic - Next topic

sulabhasabnis@gmail.com

       शल्य
झिरमिर झिरमिर श्रावणधारा
उगा होई रे जीव बावरा
आठवणींचा भार साजणा
कशी साहू  सांग  ना
तुझ्यावीण हे श्रावण सारे
कसे अनुभवू सांग सख्या रे
ऋतूऋतूंचे सुंदर वैभव
कसे पाहू साजणा
जीव कशाला सांग गुंतले
प्रेम खरे का नव्हते अपुले
जन्मभरीचा हाय दुरावा
कशी साहू साजणा
प्रेमाविण हे जीवन सारे
उगा कुणाला बांधून घ्यावे
शल्य मनीचे मायपित्यांना
कसे सांगू साजणा
    -----------       

Ganesh khot

khup awadali asech lihit raha.

ghodekarbharati