पिठोरी अमावस्या-माहिती-5

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:10:12 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "पिठोरी अमावस्या"
                                  ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "पिठोरी अमावस्या" आहे. याला श्रावण अमावस्या, पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी बैल पोळा सण देखील साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत - पूजा करतात. (अमावस्या तिथी समाप्त - 15 सप्टेंबर 2023 सकाळी 07:09 वाजता). मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियित्रीना पिठोरी अमावस्येच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सणIवर महत्त्वाची माहिती.

      पिठोरी अमावस्या चे महत्व कथा Pithori Amavasya Importance / Significance & Story--

     आटपाट नगर होतं.  तेथे एक ब्राह्मण आपल्या परिवारासोबत राहत होता. श्रावणी अमावस्याच्या दिवशी त्याच्या वडिलांचा मृत्यू होतो. पुढच्या वर्षी श्राद्धाच्या दिवशी त्याच्या बायकोच्या पोटात दुखू लागते. ती एका मुलाला जन्म देते. जन्म घेतात नवजात शिशु मरण पावतो. मात्र कोणताही ब्राम्हण श्रद्धाच जेवण जेवत नाही.

     असेच लागोपाठ सात वर्ष घडत जाते. सात वर्षे वडिलांना जेवण न घालू शकल्याने ब्राह्मण देव चिडून जातात. बायकोला घरातून हाकलून देतात. तिला जीवन मृत्यू समान वाटू लागतो. लागेल त्या मार्गाला ती चालू लागते. ती एका जंगलात पोहोचते.

     जंगलात ब्राह्मण पत्नींना एक स्त्री भेटते. ब्राह्मण पत्नी त्या स्त्रीला आपली सर्व कहाणी सांगते. आता मला जगायचं नाही असं म्हणते. त्यावर ती स्त्री ब्राह्मण पत्नींना एक उपाय सांगते.

     जंगलातील स्त्री ब्राह्मणांच्या पत्नीला सांगते, की "पुढे एक बेलपत्राचा झाड दिसेल. त्या झाडाजवळ एक शिवलिंग असेल. ज्यावेळेस रात्र होईल त्यावेळेस तिकडे  शिव पूजन साठी सात अप्सरा येतील .पूजन झाल्यावर तू त्यांच्या समोर जा. स्वतःची सत्य परिस्थिती देवकन्या, नागकन्या अशा 7अप्सरांना सांग. त्यावर त्या तुला नक्कीच उपाय देतील."

     सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण देव यांची पत्नी जवळील एका झाडावर लपून बसते. रात्र झाल्यावर साथी अप्सरांचे रथ तेथे पूजन साठी येतात. त्यांची पूजा झाल्यावर त्याआधीची कोण असा प्रश्न विचारतात? ब्राह्मण पत्नी "मी" म्हणून त्यांना उत्तर देते. मदतीसाठी ब्राह्मण पत्नी अप्सरां जवळ येते. अप्सरा तिची विचारपूस करतात. ब्राह्मण पत्नी त्यांना सर्व सत्य परिस्थिती सांगते.

     अप्सरा ब्राह्मण पत्नींच्या 7 मुलांना जीवनदान देतात.  ब्राह्मण पत्नीला 64 योगिनींची आव्हान करून पूजन करायला सांगतात. त्यावर ब्राह्मण पत्नी अप्सरांना विचारते ही पूजा केल्याने काय होईल? त्यावर अप्सरा ब्राह्मण पत्नींना सांगतात.हे पूजन केल्याने तुझ्या मुलांचं आयुष्य दीर्घ व सुखी होईल. ब्राह्मण पत्नीला शक्ती स्वरूप असणाऱ्या मा दुर्गा यांच्या 64 योगिनी यांचे पूजन केल्याने मुलांना दीर्घायुष्य लाभेल. हे व्रत सांगतात.

     ब्राह्मण पत्नी पीठाने मूर्ती बनवते. 64 योगिनी यांना आव्हान देते. त्यांची पूजा करते. हा दिवस श्रावणातील अमावस्येचा होता. ब्राह्मण पत्नी आपल्या7 मुलांना घेऊन पुन्हा आपल्या घरी येते.ब्राह्मण देव पत्नीचे व मुलांचे स्वागत करतो.आनंदाने नांदू लागते. पुढच्या श्रावणातील अमावस्येला सरांचं श्राद्ध व ब्राह्मण भोज करते. गावातील सर्वांना तिने केलेल्या व्रताबद्दल सांगते.

     त्या नगराचा राजा देखील आश्चर्यचकित होतो. तो गावांमध्ये  हे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी करावे अशी घोषणा करतो. अशी ही पाच उत्तराची कहाणी साठा उत्तर सफळसंपूर्ण व्हावी.

                मंत्र Mantra--

|| शुभम करोति कल्याणम

आरोग्यम् धनसंपदा

शत्रू बुद्धी विनाशाय

दिपक ज्योती नमोस्तुते ||

म्हणजेच याचा अर्थ असा आहे--

     नेहमीच आपल्या घरात परिवारात सगळ्यांचा कल्याण हो कामधंद्यात  शुभदा यावी. सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहावे. घरदार धनाने भरलेला असावा.  शत्रुत्वाची बुद्धी नष्ट व्हावी. ज्योती नुसार चमकणाऱ्या दिव्याला/ दीपक ला माझा नमस्कार

     पिठोरी अमावस्या च्या पूर्वीची अमावस्या म्हणजे दीप अमावस्या. त्या दिवशी आपण  दिव्याची पूजा करतो. त्यावेळेस वरील मंत्र म्हणतो. पण प्रत्येक दिवशी संध्याकाळी तसेच विशेषतः अमावस्याच्या दिवशी हा मंत्र  घरातील पूजनात म्हणावा.

--by Divya Devendra
------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भक्तिवेल.कॉम)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================