बैलपोळा-निबंध-2

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:42:44 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "बैलपोळा"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIवर निबंध.

            बैल पोळा निबंध मराठी | Bail Pola Nibandh in Marathi--

     पोळा हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. महाराष्ट्रात हा सण सर्वत्र साजरा केला जातो. भारतीय शेतकऱ्याला त्याच्या शेतीच्या कामात बैलांचा खूप उपयोग होतो. बैल वर्षभर शेतात कष्ट करतो. त्याच्यामुळे आपल्याला अन्न मिळते. बैल आपला पोशिंदा आहे. त्याचा मान राखण्यासाठी हा सण साजरा केला जातो. म्हणून या सणाला 'बैलपोळा' असेही म्हणतात.

     पोळा हा सण श्रावणातल्या अमावस्येला साजरा केला जातो. या दिवशी बैलांच्या कष्टांना सुट्टी असते. त्यांना त्या दिवशी मनसोक्त चरण्यासाठी माळरानावर सोडले जाते. आंघोळ घालून सजवले जाते. त्याला ओवाळून त्याची पूजा केली जाते. त्याला वरणापुरणाचे जेवण जेवू घातले जाते. नंतर त्याची मिरवणूकही काढली जाते
     
     हा सण म्हणजे बैलाचा सत्कारच असतो. शेतकरी हा सण मोठ्या कृतज्ञतेने व अत्यंत आनंदाने साजरा करतात.

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमे.कॉम)
                        ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================