बैलपोळा-निबंध-7

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:48:26 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "बैलपोळा"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIवर निबंध.

     आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बैल पोळा किंवा बेंदूर सणावर मराठी निबंध (Bail Pola information in Marathi). बैल पोळा किंवा बेंदूर सणावर लिहिलेला हा निबंध मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

     तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी बैल पोळा किंवा बेंदूर मराठी माहिती निबंध (Bail Pola essay in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर विषयांवर सुद्धा मराठीमध्ये निबंध आहेत, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

              बैल पोळा निबंध--

     पोळा, बैल पोळा किंवा बेंदूर हा सण शेतकऱ्याच्या लाडक्या बैलाच्या सन्मानाचा उत्सव आहे जो प्रामुख्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात मधील शेतकरी साजरा करतात. तेलंगणाच्या काही भागातील लोक याच बैल पोळा सणाला पुलाला अमावस्या असेही म्हणतात.

               परिचय--

     महाराष्ट्रात या सणाला बेंदूर सुद्धा म्हटले जाते. बेंदूर हा उत्सव साधारणपणे मध्य आणि पूर्व महाराष्ट्रातील आणि मराठी लोकांमध्ये जास्तकरून साजरा केला जातो.

     तसेच हा उत्सव भारतातील इतर ठिकाणी सुद्धा साजरा केला जातो, दक्षिण भारतात या सणाला मट्टू पोंगल असे म्हणतात आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन म्हणतात. बैल पोळा हा सण साधारणपणे श्रावण महिन्याच्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी येतो.

              बैल पोळा का साजरा केला जातो ?--

     आपल्या देशात शेती हा मुख्य व्यवसाय आहे, खूप सारे लोक शेतीवर अवलंबून आहेत. बैल हा शेतकरी राज्याचा मित्र आहे. बैल शेतीच्या कामात खूप राबतात. जरी काही लोक आजकाल शेतीसाठी ट्रॅक्टर वापरत असले तरी अजून सुद्धा लोक बैलांचा वापर करतात. अजून सुद्धा शेतीची अवजड कामे जसे कि नांगरणी, पेरणी, मळणी, पिकाची वाहतूक हि बैलांच्या साह्यायानेच केली जाते. ज्यावेळी वाहने नव्हती त्यावेळी सर्व लोक या गावाहून, त्या गावाला जायला बैलगाडीचा वापर करत असत. बैलाचे शेतकऱ्याच्या आयुष्याशी खूप जवळचे नाते होते. आपल्या या मित्राचे आभार मानण्यासाठी शेतकरी राजा दरवर्षी बैल पोळा सण साजरा करतो.

--by Marathi Social
----------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीसोशल.कॉम)
                       -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================