बैलपोळा-कविता-1-पोळा

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:58:04 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIवर कविता.

                                        "पोळा"
                                       --------

रात दिन करी कष्ट

ओल्या मातीच्या रानात

तेल हळद लाऊन

खांदे मळण दारात ।।


बैल राबतो शेतात

धान्य देई पिकवून

सुखी होई घर सारे

मग खातात बसून ।।


घाली आंघोळ जोडीला

पोळा येतो आनंदाचा

देते ओवाळून राणी

घास पुरण पोळीचा ।।


बैल सजून धजून

बांधे येशीला तोरण

झूल घाली अंगावर

आने गावात फिरून। ।।


गाव येशीतून चाले

साऱ्या बैलाचा तो पोळा

नवे कपडे घालून

सारे जन होती गोळा ।।


पाय धुऊन बैलाचे

कुंकू लावते कपाळी

पुजा आरच्या करून

घाली पुरणाची पोळी ।।

--विजय सानप
-------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरीमिरर.कॉम)
                        -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================