१४-सप्टेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 04:59:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                "१४-सप्टेंबर-दिनविशेष"
                               ----------------------

-: दिनविशेष :-
१४ सप्टेंबर
हिन्दी भाषा दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००३
इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.
१९९९
किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
१९९५
संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर
१९६०
'ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कन्ट्रीज' (OPEC) ची स्थापना झाली.
१९५९
सोव्हियेत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.
१९४८
दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला. देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर सुमारे साडे सहाशे वर्षांनी स्वतंत्र झालेल्या किल्ल्यात भारतमातेचे मंदिर उभारण्यात आले.
१९१७
रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.
१८९३
सरदार खाजगीवाले, श्री. गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले. लोकमान्य टिळकांनी हा उपक्रम उचलून धरून त्याला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरुप दिले. हीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात होय.
७८६
हरुन अल रशिद बगदादचा खलिफा झाला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६३
रविंद्र रामनारायण ऊर्फ 'रॉबिन' सिंग – अष्ट्पैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक
१९५७
केपलर वेसेल्स – दक्षिण अफ्रिकेचा आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू.
१९४८
वीणा सहस्रबुद्धे
वीणा सहस्रबुद्धे – ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका, आय. आय. टी. (पवई) मध्ये मानवविज्ञानाच्या सहाय्यक प्राध्यापक (२००२-२००४), संगीत नाटक अकादमी पारितोषिक (२०१३)
(मृत्यू: २९ जून २०१६)
१९३२
डॉ. काशिनाथ घाणेकर
डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते, मराठीतील पहिले सुपरस्टार, हे शिक्षणाने दंतवैद्य (Dentist) होते. तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, रायगडाला जेव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, गारंबीचा बापू, गुंतता हृदय हे, आनंदी गोपाळ इ. नाटके तर मराठा तितुका मेळवावा, पाठलाग, दादी माँ (हिंदी), मधुचंद्र, एकटी, प्रीत शिकवा मला, देवमाणूस, गारंबीचा बापू, अजब तुझे सरकार, झेप, घर गंगेच्या काठी, हा खेळ सावल्यांचा, चंद्र होता साक्षीला हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
(मृत्यू: २ मार्च १९८६ - अमरावती)
१९२३
राम जेठमलानी
राम जेठमलानी – केन्द्रीय कायदामंत्री, कायदेपंडीत व निष्णात वकील, दोन वेळा लोकसभा खासदार (वायव्य मुंबई), पाच वेळा राज्यसभा खासदार, वयाच्या १७ व्या वर्षीच ते एल. एल. बी. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
(मृत्यू: ८ सप्टेंबर २०१९ - नवी दिल्ली)
१९२१
दर्शनसिंहजी महाराज
संत दर्शनसिंहजी महाराज – शिख संतकवी, 'मंजील-ए-नूर' आणि 'मता-ए-नूर' या ऊर्दू कवितासंग्रहांबद्दल त्यांना ऊर्दू अकादमीचे पुरस्कार मिळाले.
(मृत्यू: ३० मे १९८९)
१९०१
यमुनाबाई हिर्लेकर – शिक्षणतज्ञ व विचारवंत
(मृत्यू: ? ? ????)
१८९७
पार्श्वनाथ आळतेकर
पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक
(मृत्यू: २२ नोव्हेंबर १९५७)
१८६७
विष्णुबुवा जोग
विष्णू नरसिंह तथा विष्णुबुवा जोग – वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक
(मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२०)
१७१३
योहान कीज – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ
(मृत्यू: २९ जुलै १७८१)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०११
हरिश्चंद्र बिराजदार
राष्ट्रपतींच्या हस्ते 'ध्यानचंद पारितोषिक' स्वीकारताना
(२९ ऑगस्ट २००६)
रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार – कुस्तीगीर व प्रशिक्षक, १९७० च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते
(जन्म: ५ जून १९५० - लातूर)
१९९८
प्रा. राम जोशी – शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: ? ? ????)
१९८९
बेन्जामिन पिअरी पाल – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक, पद्मश्री (१९५८), पद्मभूषण (१९६८), इंडीयन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च (ICAR) चे पहिले संचालक, तांबेरा रोगाला दाद न देणार्‍या व अधिक उत्पादन देणार्‍या गव्हाच्या जाती त्यांनी शोधून काढल्या.
(जन्म: २६ मे १९०६)
१९०१
विल्यम मॅक किनले
अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक किनले यांची एका वेडसर इसमाने गोळ्या घालून हत्या केली.
(जन्म: २९ जानेवारी १८४३)
८९१
पोप स्टीफन (पाचवा)
(जन्म: ? ? ????)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================