बैलपोळा-हार्दिक शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 05:07:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "बैलपोळा"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIच्या हार्दिक शुभेच्छा.

     नमस्कार मित्रानो ,भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, जिथे शेतीला चांगले बनवण्यासाठी गुरांचेही विशेष योगदान आहे. भारत देशात या गुरांची पूजा केली जाते. पोळा हा एक सण आहे आणि या सणामध्ये शेतकरी गाय आणि बैलांची पूजा करतात. हा पोळा सण विशेषतः छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात साजरा केला जातो. आज आम्ही या पोस्ट मध्ये बैल पोळा या सणाबद्दल काही शुभेच्छा संदेश देत आहोत जे तुम्ही तुमच्या मित्र मंडळी मध्ये share करू शकता.

         बैल पोळा शुभेच्छा मराठी 2023 || Bail Pola Wishes--

=========================================
जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि
बैलाविना नाही शेतीला पर्याय,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
आज जरा घे थोडीशी विश्रांती,
आज करु दे तुझ्यासाठी सगळं काही,
कारण तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई,
आपला सर्जाराजा
शेतकर्‍याच्या सच्चा मित्राला
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई,
किती वर्ण तुझं गुणं मन मोहरुन जाई,
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई,
एका दिवसाच्या पुजेने होईल कसा उतराई
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा,
दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
सण आला आनंदाचा,
माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या माथी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●

आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●

कष्ट हवे मातीला
चला जपूया पशूधनाला
बैल पोळा सणाच्या शेतकरी बांधवांना
खूप खूप शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●
=========================================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीभाऊ.कॉम)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================