बैलपोळा-हार्दिक शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 05:10:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIच्या हार्दिक शुभेच्छा.

        बैल पोळा शुभेच्छा मराठी 2023 || Bail Pola Wishes--

=========================================
तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई ||
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा
सणाच्या हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●

आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देणं,
बैला खरा तुझा सण,
शेतक-या तुझं रीन बैल
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीतील
मुख्य घटक असलेल्या मुक्या
प्राण्यांबद्दल कृतज्ञता,
व्यक्त करण्याचा दिवस
म्हणजे बैल पोळा!
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●

भारताची कृषी संस्कृती चा
महापर्व बैल पोळाच्या
हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●

भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत
मुक्या जनावरांची ही पूजा करावी
अशी शिकवण देणाऱ्या पोळा या
सुंदर सणांच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●

कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळा,
सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●

जगाचा पोशिंदा असलेल्या
शेतकरी बांधवांना बैल
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●
=========================================

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीभाऊ.कॉम)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================