बैलपोळा-हार्दिक शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 05:11:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                         "बैलपोळा"
                                        -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIच्या हार्दिक शुभेच्छा.

     बैलपोळा म्हणजे बैलाची दिवाळीच जणू! बैलपोळ्याच बेंदूर असेही म्हटले जाते. बैलपोळा हा शेतकऱ्यांचा अतिशय आवडीचा सण. या दिवशी त्याच्या शेतात राबणाऱ्या सवंगड्याला तो फार रुबाबाने सजवतो, त्याची मिरवणूक काढतो.

       [2023] बैलपोळा शुभेच्छा संदेश | Bail Pola Wishes In Marathi |बेंदूर शुभेच्छा संदेश--

=========================================
बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
🌸🌸🌸🌸

सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी👨‍🌾,
सण गावच्या मातीचा🙏,
🌸🌸🌸🌸

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..
🌸🌸🌸🌸

भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत मुक्या जनावरांची ही पूजा करावी
अशी शिकवण देणाऱ्या पोळा या सुंदर सणांच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा!
🌸🌸🌸🌸

जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि
बैलाविना नाही शेतीला पर्याय,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
🌸🌸🌸🌸

सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा!
🌸🌸🌸🌸

कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळाच्या,
🌿सर्व शेतकरी बांधवांना
हार्दिक शुभेच्छा.!!🌿
🌸🌸🌸🌸

आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देनं..
बैला, खरा तुझा सन,
शेतकऱ्या तुझं रीन..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
🌸🌸🌸🌸
=========================================

--by Shabdakshar
--------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-शब्दIक्षर.इन)
                       --------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================