बैलपोळा-हार्दिक शुभेच्छा-7

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 05:16:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIच्या हार्दिक शुभेच्छा.

       [2023] बैलपोळा शुभेच्छा संदेश | Bail Pola Wishes In Marathi |बेंदूर शुभेच्छा संदेश--

=========================================
संपलो जरी मी तरीही
तू धिर मात्र सोडू नकोस,
उजळेल पुन्हा दिस नवा
तू जगणे मात्र सोडू नकोस...
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!
🌸🌸🌸🌸

सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!
🌸🌸🌸🌸

शेतकऱ्यांच्या मुकुंदा...
प्रपंच आमुचे उजाड अंगण,
तुझ्याच घामाने होते नंदनवन...
घे मनमुराद आज सजून,
भाजी भाकर गोड मानून,
होउदे आज पूर्ण तुझ्या साऱ्या इच्छा,
बैल पोळ्याच्या तुलाही
खूप खूप शुभेच्या.!!
🌸🌸🌸🌸

आज दिनी नाही बैलास काम धाम,
पुरणपोळी खाऊन नुसता आराम
Happy Pola
🌸🌸🌸🌸

गेला तिफन, गेला कुळव,
शिवाळ गेली, बैल गेले,
ट्रॅक्टरचा जमाना आला,
दारात नाही सर्जा राजा,
नुसताच कोरडा बेंदूर आला,
बैलपोळाच्या हार्दिक शुभेच्छा!
🌸🌸🌸🌸

शेतकऱ्या सोबत कष्ट करितो
पिकवितो रान मोती
राबराब राबून घामाने
ओली झाली काळी माती..!
🌸🌸🌸🌸
=========================================

--by Shabdakshar
--------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-शब्दIक्षर.इन)
                        --------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================