बैलपोळा-हार्दिक शुभेच्छा-9

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 05:19:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "बैलपोळा"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIच्या हार्दिक शुभेच्छा.

     बैल पोळा या सणाला पोळा असेही म्हटले जाते. तुम्ही जर बैल पोळा SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच बैलपोळा संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी बैल पोळ्याच्या शुभेच्छा, बैल पोळा Wishes चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

            बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा..!

आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देनं..
बैला, खरा तुझा सन,
शेतकऱ्या तुझं रीन..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा राजाचा हा दिन..
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण..
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

आला रे आला बैल पोळा,
गाव झालं सारं गोळा..
सर्जा राजाला घेऊनि,
सारे जाऊया राऊळा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!
=========================================

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदीमराठीsms.कॉम)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================