पावसातील प्रेम कविता-पाहता तुला मी हरवून गेलो,तुझ्या प्रेमात मी बुडून गेलो-B

Started by Atul Kaviraje, September 15, 2023, 11:12:21 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातील एक अनोखी प्रेम कविता-गीत ऐकवितो. "तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना, जो होश था, वो तो गया"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही पाऊस नसलेली, परंतु मळभ दाटलेली आणि मन उत्साहित करणारी सुंदर, शुक्रवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना, जो होश था, वो तो गया )
------------------------------------------------------------------------

                  "पाहता तुला मी हरवून गेलो, तुझ्या प्रेमात मी बुडून गेलो"
                 --------------------------------------------------

     प्रियकरI, ही प्रेम-आग दुतर्फाच लागलीय बरं, हे आहे खरं
     तुझ्याशी नजरानजर होताच मनातील तIर झंकारू लागली सुस्वर
     तू तोच होतास, माझ्या नेहमीच स्वप्नांत येत होतास, मला छळत होतास,
     तुझ्याप्रमाणेच मीही झालेय प्रेम-दिवाणी, तुझ्या मिलनास आहे मीही आतुर

     कोणजाणे माझी ही अवस्था तूच केलीस बहुतेक, तूच आहेस याला जिम्मेदार
     कोणजाणे माझ्या या स्थितीला तूच आहेस कारण, तूच आहेस जबाबदार
     तुझी एक झलक पाहण्यास आतुर आहेत माझे नयन, नाहीय त्याला अंतःपIर,
     कर्ण माझे लागलेत तुझ्या ओठांकडे ऐकण्या तुझा प्रेम-शब्द उच्चIर

     का जाणे मी आज माझ्या काबूत नाही, जणू माझं अस्तीत्त्व शाबूत नाही
     कुठेतरी हरवलेय जणू मी, काहीतरी हरवलंय माझं, मी ते शोधीत राही
     ना निज डोळ्यांवर, स्वप्ने झुलताहेत पापण्यांवरी, निद्रेच्या काठावर अवचित जIग येई,
     मन चलबिचल, देहात अनपेक्षित हालचाल, पराकोटीची अस्वस्थता येऊन येऊन राही

     मनात अरमान प्रकट होताहेत, मनात उर्मी उचंबळून येताहेत
     सुप्त इच्छांचे वादळ घोंघावत आहे मनात, भावना भरभरून वाहताहेत
     प्रत्येक श्वासोश्वासात वादळ भरलंय जणू, उष्ण तप्त लाटा प्रवाहित होताहेत,
     डोळ्यात स्वप्नाचे चांदणे प्रकाशतेय, या प्रकाश-लहरी मला कोणता रस्ता दाखवताहेत ?

     का कोण जाणे, आज चालताना माझा तोल जातोय, पावले भरकटताहेत
     का कोण जाणे, आज माझ्या मनावर माझा ताबा नाहीय, ते बहकतेय
     ही कुठली शुभI-शुभाची नांदी तर नव्हे, हे सर्व कुठला संदेश देताहेत ?,
     मी प्रेमात तर नाही ना, मला प्रेम झालंय की काय, हे कोणते संकेत मिळताहेत ?

     हे बहकणार मन, हे महकणार तन, हे फडफडणारे नयन
     हे अस्थिर व्याकुळ मन, हे तरसणार, तडपणार बदन, हे चंचल नयन
     हे काय घडतंय माझ्याबरोबर आज, हे कोण घडवून आणतय, याला कोण कारण ?,
     यावर उपाय कोणता, यावर इलाज काय, काहीही नाही सुचत, याच काय निवारण ?

     माझ आज कुठेच ध्यान नाहीय, माझं मन आज थाऱ्यावरच नाही
     माझं आज कुठेच लक्ष नाही, माझं मन आज वाऱ्यावर स्वIर आहे
     माझे चालणे आज बहकत आहे, माझे पाऊल जणू जमिनीवरच नाही,
     माझ्या डोळ्यांत आहे लज्जेचा पडदा, माझी नजर जमिनीवरून हलतच नाही 

     आज मी तुला पाहिलंय, आज मी तुला जाणलंय
     तूच आहेस माझं प्रेम, तुझ्या नजरेतून ते मला कळलंय
     आज मी तुला ओळखलंय, तुला मी आज समजून घेतलंय,
     तूच आहेस माझं जीवन, तुला मिळवून ते कृतार्थ झालंय 

पाहता तुला मी हरवून गेलो
तुझ्या प्रेमात मी बुडून गेलो
तुझं प्रेमचं माझं सर्वस्व आहे, राणी,
तुझ्याच प्रेमाने मी आहे तरलो

पाहता तुला मी हरवून गेलो
तुझ्या प्रेमात मी बुडून गेलो
तुझं प्रेम मी नेहमीच जपेन आयुष्यभर,
तुझ्या प्रेमानेच मी आज घडलो

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2023-शुक्रवार.
=========================================