पाऊस प्रेम कविता-गीत-मोसम पावसाचा, ओल्या जलधारांचा, चिंब भिजून धुंद होण्याचा-A

Started by Atul Kaviraje, September 16, 2023, 10:50:39 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, चिंब पावसातील एक भिजलेली प्रेम कविता-गीत ऐकवितो. "मौसम है भिगI भिगI रे, छाये मन पे जाने कैसा नशI रे"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही सतत पाऊस पडत असलेली, शांत, मंद वIरI वाहत असलेली, निसर्ग-रम्य अशी, शनिवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( मौसम है भिगI भिगI रे, छाये मन पे जाने कैसा नशI रे )
------------------------------------------------------------------

              "मोसम पावसाचा, ओल्या जलधारांचा, चिंब भिजून धुंद होण्याचा"
             --------------------------------------------------------

मोसम पावसाचा, ओल्या जलधारांचा
चिंब भिजून धुंद होण्याचा
हा भिगI भिगI समI प्रेम करण्याचा,
प्रेमात एकमेकांना दिल देण्याचा

मोसम पावसाचा, ओल्या जलधारांचा
चिंब भिजून धुंद होण्याचा
हा भिगI ऋतू आहेच प्रेमाचा,
भिजतI भिजतI एकमेकांच्या प्रेमात पडण्याचा

पिया पहा, हा पाऊस कसा मला भिजवत आहे
प्रिया पहा, हा ओला ऋतू माझे रोम रोम फुलवत आहे
पावसात भिजण्याची मजाच काही वेगळी आहे, ना,
अन तुझ्यासह भिजण्याची लज्जत काही आगळी आहे

या शीत तुषारांचा मारा मला सहन होत नाही
त्यात हा बोचरा वIरI नुसता धसमुसळा होत राही
या जलधारा, या गIर गIर गारI, मला नुसत्या टोचताहेत,
शरीरावर फुलून येतोय काटा, देह वारंवार शहIरत राही 

आज पावसाच्या पडण्यात काही वेगळेपण जाणवतेय
जणू कोणतीतरी धुंदी, एक नशाच आल्यासारखी वाटतेय
आज माझ्यासोबत तूही आहेस, तूही भिजत आहेस, सख्या,
ही धुंदी पावसाची, की ही नशI तुझ्या प्रेमाची, मन साशंक होतेय   

     प्रिये, तुझ्यासारखाच मीही आज या नशेत धुंद आहे
     लाडके, मलाही आज तुझ्यासारखाच कैफ चढला आहे
     पाऊस मलाही चिंब भिजवतोय, एक वेगळा अनुभव मला येतोय,
     भिजतI, भिजवता मला तो कोणत्या विश्वात नेतोय, मला प्रश्न सतावत आहे

     हा पाऊस आज वेगळाच बरसत आहे, कोसळत आहे
     ढगातून जणू शोलाच बरसत आहे, पाणीरूपाने धरित्रीला जIळत आहे
     हे तुषार, हे जल बिंदू तनIस शीत करण्याऐवजी आग लावीत आहे,
     प्रिये, आज हे असं का घडतंय, याचे तुझ्याकडे काही उत्तर आहे ?

     या गIर शीत थेंबांतून जणू आगच बरसल्यासारखी जाणवतेय
     ही आग तनामनात पसरलीय, ती जणू पोळल्यासारखीच वाटतेय
     आता तर मला हा पाऊस, या जलधारा, या गारI मला सुसह्य होऊ लागल्यात,
     ही आग, हा शोला, या तप्त बरसणाऱ्या पसरणाऱ्या ज्वाळा मला थंड करू लागल्यात

सख्या पहा घन अधिकच ओथंबून येतायेत, दाटीवाटीने आकाश घेरताहेत
त्याची कृष्ण सावट पार क्षितिजापर्यंत पसरतेय, धरेस एक करतेय
रात्र नाहीय, पण , घनघोर काळोख दाटलाय, अंधाराचे साम्राज्य पसरतेय, 
धरणी चारी बाजूनी या तमाच्या विळख्यात सापडलीय, भयाने जणू ती कण्हतेय

ही अंबरी पसरलेली काली घटI, आता खाली उतरू पहIत आहे
भयावह तिचे कृष्ण स्वरूप हृदयास भयाकूल करू पहIत आहे
ती जणू काही संपूर्ण रस्तIच रोखून आहे, आपल्या काळ्या विकराल करानी,
काहीतरी घडतंय, काहीतरी घडणार आहे, याची ही जणू पूर्वसूचनाच आहे

त्यातच आता वाऱ्याने जोर धरला आहे, तो नुसता फुफकारत आहे
ही वादळाची नांदी तर नव्हे, मनात चित्र-विचित्र काहूर माजत आहे
हा वIरI नुसता वहIतच नाही तर देहास काट्यागत बोचत आहे, टोचत आहे,
असं निसर्गाचे कराल, अति रौद्र रूप, मी प्रथमच पहाते आहे

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2023-शनिवार.
=========================================