१७-सप्टेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, September 17, 2023, 05:40:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१७.०९.२०२३-रविवार.जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                 "१७-सप्टेंबर-दिनविशेष"
                                ---------------------

-: दिनविशेष :-
१७ सप्टेंबर
राष्ट्रीय श्रम दिवस
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००१
सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पुन्हा सुरू झाले.
१९८८
शुभंकर होडोरी
दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९८३
वनीसा विल्यम्स
वनीसा विल्यम्स 'मिस अमेरिका' बनणारी पहिली कृष्णवर्णीय स्त्री ठरली. मात्र पेन्टहाऊस मासिकात प्रकाशित झालेल्या तिच्या नग्न छायाचित्रांमुळे काही महिन्यातच तिला या किताबाचा त्याग करावा लागला. या किताबाचा त्याग करावी लागणारीसुद्धा ती पहिलीच स्पर्धक आहे. मिस अमेरिका २०१६ स्पर्धेची ती प्रमुख परीक्षक होती.
१९५७
मलेशियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
१९४८
हैदराबादच्या निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
१६३०
बॉस्टन
बॉस्टन शहराची स्थापना झाली
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५१
डॉ. राणी बंग
डॉ. राणी बंग – समाजसेविका
१९५०
नरेन्द्र मोदी
नरेन्द्र मोदी – भारताचे १४ वे पंतप्रधान, गुजरातचे १४ वे मुख्यमंत्री (७ ऑक्टोबर २००१ ते २२ मे २०१४)
१९३९
रविंद्र सदाशिव भट – गीतकार व कवी
(मृत्यू: २२ नोव्हेंबर २००८)
१९३८
दिलीप पुरुषोत्तम चित्रे
दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार
(मृत्यू: १० डिसेंबर २००९ - पुणे)
१९३७
सीताकांत महापात्र – १९९३ चा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात ओडिया कवी
१९३०
लालगुडी जयरामन
लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक
(मृत्यू: २२ एप्रिल २०१३)
१९२९
अनंत पै ऊर्फ 'अंकल पै' – 'अमर चित्र कथा' चे जनक
(मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११)
१९१५
मकबूल फिदा हुसेन – चित्रकार व दिग्दर्शक
(मृत्यू: ९ जून २०११)
१९१४
थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक
(मृत्यू: १ सप्टेंबर २००८)
१९०६
ज्युनिअस जयवर्धने
ज्युनिअस रिचर्ड जयवर्धने – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (४ फेब्रुवारी १९७८ ते २ जानेवारी १९८९) आणि ७ वे पंतप्रधान (२३ जुलै १९७७ ते ४ फेब्रुवारी १९७८)
(मृत्यू: १ नोव्हेंबर १९९६)
१९००
जे. विलार्ड मेरिऑट – मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक
(मृत्यू: १३ ऑगस्ट १९८५)
१८८५
केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे – पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते
(मृत्यू: २० नोव्हेंबर १९७३)
१८८२
अवंतिकाबाई गोखले – महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व 'हिंद महिला समाज'च्या संस्थापिका
(मृत्यू: २६ मार्च १९४९)
१८७९
पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते
(मृत्यू: २४ डिसेंबर १९७३)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००२
विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार
(जन्म: २५ जुलै १९२२)
१९९९
हसरत जयपुरी – गीतकार
(जन्म: १५ एप्रिल १९२२)
१९९४
व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू
(जन्म: २६ जुलै १९५४)
१९३६
१८५०
हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर
हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: ८ आक्टोबर १९५०)
१८७७
हेन्‍री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ
(जन्म: ११फेब्रुवारी १८००)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.09.2023-रविवार.
=========================================