पाऊस प्रेम कविता-तुझ्या उष्ण स्पर्श मला पोळतोय, माझ्या देहात तप्त ज्वाळा पसरवतोय

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 10:47:30 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातील एक दाहक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "मुझे  क्या  हुवा  ये बतI, मैने  तुझे  छुवा तो तन  जला"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही पाऊस थांबलेली, थंडगार वIरI वहIत असलेली, मन उत्साही करणारी, आणि कोवळे ऊन पडलेली सोमवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( मुझे  क्या  हुवा  ये बतI, मैने  तुझे  छुवा तो तन  जला )
-----------------------------------------------------------------

          "तुझ्या उष्ण स्पर्श मला पोळतोय, माझ्या देहात तप्त ज्वाळा पसरवतोय"
         -------------------------------------------------------------

तुझा उष्ण स्पर्श मला पोळतोय
माझ्या देहात तप्त ज्वाळा पसरवतोय
गरम लाटांनी माझं शरीर चारी बाजुंनी घेरलंय,
या दग्ध लहरींचा चटकाच मला बसतोय

तुझा उष्ण स्पर्श मला पोळतोय
माझ्या देहात तप्त ज्वाळा पसरवतोय
आता तर त्या ज्वाळांनी पूर्ण वेढलंय मला,
उकळतI लाव्हारस गात्रागात्रातून प्रवाहित होतोय

आज तुझा स्पर्श मला इतका तप्त का भासतोय ?
आज तुझा स्पर्श जणू माझी सुप्त चिंगारी भडकवतोय
ही आग अशी कशी, पूर्ण देहाला जIळत जातेय,
ही आग विझेल तरी कशी, साऱ्या तनुला पोळत जातेय

माझ्या दबलेल्या भावनांना तुझा स्पर्श वात देतोय
माझ्या लपवलेल्या भाव भावनांना तुझा स्पर्श सुरुंगचं लावतोय
हे काय घडतंय माझ्याबरोबर आज, असं कधीच घडलं नव्हतं,
हा अग्नी विझतचं नाहीय, उलट वणव्यासम पूर्ण देहात पसरत जातोय

     प्रिये, हे माझं प्रेम आहे, ज्यासाठी तू तरसत होतीस
     सखे, ही माझी प्रीत आहे, ज्यासाठी तू व्याकुळ होतीस
     माझ्या स्पर्शाने ही आग लावलीच नाहीय, चिंगारी पेटवली नाहीय,
     तुझ्या अंतर्मनातील या दबलेल्या भावनाच आहेत, ज्या तू बाळगत होतीस

     ही आग दोन्हीकडे अगदी बरोबर लागली आहे
     ही चिंगारी दोन्हीकडे अगदी सारखीच भडकत आहे
     हा तर मनाचा खेळ आहे, दोन हृदयाचा मेळ होणे आहे,
     आपले मिलनच यावर उपाय आहे, त्यानेच तर ही आग विझणार आहे

प्रिया, त्यातच हा घनघोर पाऊस तुफान कोसळत आहे
पिया, त्याच्या जोरदार जलधारा धरेवर येऊन अIदळत आहेत
पडतI पडतI तो आपले मन रिझविलं का, मनाला राहत देईल का ?,
कोसळतI कोसळतI तो या तप्त, उष्ण शरीराचा दाह शमविलं का ?

वर आभाळी ढगांचीही एकमेकांत चुरस लागली आहे
या चुरशीत काळी घटI आणीकच गडद होऊ लागली आहे
या घनांमधून बरसते जल माझ्या शरीराला शीतलता देईल का ?,
माझ्या आर्त, तृषार्त, तहानलेल्या मनाची तो तहान भागविलं का ?

     सजणे, हा बरसतI पाऊस नुसता पडतच राहील
     सखये, हा ढग नुसता जल बरसवतच राहील
     त्यांना काय पडलंय तुझं, त्यांना नाहीय तुझ्या भावनांची कदर,
     वर्षातून एकदाच झरतात ते, ते काय त्यांचं काम करत राहतील

     हा ओला ऋतू तुझं तन मन काही थंड करणार नाही
     हा बरसतI बIदल तुझी तहान काही भागवणार नाही
     लाडके, या साऱ्यांवर आहे एकचं खात्रीलायक उपाय,
     आपल्या दोघांचे मधुर मिलन, हेच एक औषध लागू होई

हा द्वाड पाऊस माझ्या अंगाला झोम्बतोय, माझा देह जणू चुंबतोय
हा धसमुसळा पाऊस मला सतत भिजवतोय, माझ्याशी लाडीगोडी करतोय
हा पाऊस गात आहे, लहरत आहे, माझ्या मनाचा कब्जा घेत आहे,
आज या लबाड पावसाला झालंय काय, तो माझ्या तनुशी जणू खेळतं आहे

प्रिया सांग मला, हे काय विपरीत घडतंय माझाबरोबर आज ?
साजणा, हे गूढ काय आहे, उलगडून सांग मला हे पावसाचे राज
प्रत्येक पावसात हे असंच घडतंय, याच मला आधीच होतI अंदाज,
यात काय गुपित आहे दडलेलं, सांग सख्या, आता होऊ नकोस तू हमराज

     अगं, हा पाऊसही तुझा चाहता झालाय, तुझा दिवाणI झालाय
     अगं, हा पाऊसही तुझ्यावर प्रेम करू लागलाय, तुझ्यावर लट्टू झालाय
     तुझ्या लहरत्या कृष्ण कुंतलावर तो आसक्त झालाय, तुझे केश चुम्बायI तो आलाय,
     तुझं रूप पाहण्या तो इतका बरसलाय, तुला चिंब करण्यासाठीच तो इतका पडलाय

     तो इतका पडतोय, इतका कोसळतोय, तरी तुझ्यापुढे शेवटी हIरच मानतोय
     तुला चिंब करण्यात तो असमर्थ ठरतोय, तरी तो पडतच राहतोय
     तुझ्या चिकण्या, मुलायम त्वचेवर पाणी टीकतच नाहीय, ते निथळुनच जातंय पाहता पाहता,
     तुझ्या उष्ण ओठांवर थबकून हे थेम्ब वाफच होताहेत, विरघळून जाताहेत, वाहता वाहता

तुझा उष्ण स्पर्श मला पोळतोय
माझ्या देहात तप्त ज्वाळा पसरवतोय
ये, या पावसात मला जवळ घे, पिया,
तुझ्या गरम मिठीत माझा देह पूर्ण वितळतोय

तुझा उष्ण स्पर्श मला पोळतोय
माझ्या देहात तप्त ज्वाळा पसरवतोय
तुझ्या प्रेमाने माझ्या मनावर पूर्ण कब्जा केलाय,
तुझ्या प्रेमाचा कैफ संपूर्ण देहात पाझरतोय

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================