हरितालिका-माहिती-3

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:04:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "हरितालिका"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरितालिकेवर महत्त्वाची माहिती.

     "हरीता" म्हणजे जिला घेऊन जाण्यात आले ती व "आली" म्हणजे सखी ( मैत्रीण ). शिवप्राप्तीसाठी , महादेव मिळावा यासाठी व्रत ,तपश्चर्या करण्यास पार्वतीला मैत्रीण घेऊन गेली होती. म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात .

     Hartalika हे पार्वतीचेच नाव असून हे व्रत स्वतःहा पार्वतीने भगवान शंकरासाठी केले म्हणून या व्रताला हरितालिका नाव आहे.

          2023 मध्ये हरतालिका हे व्रत कोणत्या दिवशी कोणत्या महिन्यात आहे ?--

     हरतालिकI व्रत म्हणजे काय ? हे आपण आताच बघितले . आता आपण बघुयात कि मराठी कॅलेंडर नुसार hartalika 2023 marathi vrat म्हणजेच स्वर्ण गौरी व्रत अर्थात hartalika marathi vrat या वर्षांमध्ये कोणत्या दिवशी आहे .

     वार्षिक पंचांग नुसार व कॅलेंडर नुसार भाद्रपत शुक्ल ३ , स्वर्ण गौरी व्रत , वाहन मेंढा , असून हरतालिका व्रत हे 18 सप्टेंबर , वार सोमवार , 2023 रोजी येत आहे .

          हरितालिका ( हरतालिका ) व्रत कथा मराठी | Hartalika Vrat Katha In Marathi | hartalika katha in marathi--

     हरतालिका व्रताच्या देवता शिव व पार्वती आहेत . पार्वती हि शिवाची म्हणजे ( महादेव ) यांची पत्नी आहे , आणि खूप पतीव्रता सुद्धा आहे.

     जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणुन पार्वतीने खूप तप केले , कडक व्रत केले आणि त्याच व्रताला hartalika vrat असे म्हणतात. हेच व्रत करून पार्वतीने शंकरास वरले म्हणजे ( पती बनवले ).

     पण पार्वतीचे वडील दक्षराज यांना हे अजिबात आवडले नाही . त्यानंतर दक्षराजाने महायज्ञ यागसतरा नावाचा यज्ञ आरंभ केला . व या यज्ञाच्या कार्यक्रमास मात्र त्यांनी स्वतःच्या मुलीला आणि जावयाला बोलावले नाही .म्हणजेच शिव-पार्वती यांना दक्षराजाने आमंत्रित केले नाही.

     वेद आणि शेष ज्यांचे स्तुती करतात व ब्रह्मा विष्णू ज्यांना वंदन करतात अश्या शिवजगात्मा देवांचा देव महादेव यांचा महिमा जाणून न घेता दक्षराज शिवाची निंदा करीत असे . दक्षराजा शिवाला (महादेवाला) देव मानत नव्हते .

     आपल्या वडिलांनी महायज्ञ यागसतरा सुरु केला त्या पूजेला सर्व देवांना बोलावले परंतु माझा पती महादेव यास व मला बोलावले नाही म्हूणन पार्वतीला खूप दुःख झाले व मनाची समजूत काढत होती कि आपल्याला आमंत्रण द्यायचे विसरले असतील .

     आमंत्रण घेऊन येतील अश्या आशेने कैलास पर्वतावर आतुरतेने वाट बघत होती . नंतर पार्वती महादेवाला म्हणाली हे देवा माझे वडील यांनी महायज्ञासाठी आपल्याला आमंत्रण देण्यास विसरले मात्र मला तिथे जायला हवे .

--By-poonam m.
-------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीफेस्टिवल.कॉम)
                      ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================