हरितालिका-माहिती-4

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:06:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "हरितालिका"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरितालिकेवर महत्त्वाची माहिती.

     पार्वतीचे बोलणे ऐकून महादेव म्हणाले हे गौरी तू तिथे जाऊ नकोस हे अर्धांगिनी तुझा पिता माझा व्देष करतो . तू तिथे मुळीच जाऊ नकोस आणि तू तिथे गेलीस तर तुझा पिता तुझा अपमान करील. शिव पार्वतीला हे सांगत असतांना देवर्षी नारदमुनी तिथे आले .आणि त्यांनी शिव-पार्वतीचे सगळे बोलने ऐकले होते.

     आणि ते पार्वतीला म्हणले हे देवी वडिलांच्या (पित्याच्या) घरी जायला मुलीने मानपान बघू नये ,नारदाचे हे बोलणे ऐकून पार्वतीने निच्चय केला . व ती लगेच दक्षराजाच्या महायज्ञाच्या ठिकाणी सोबतीला भूतगन घेऊन निघाली व नंदीवर बसून दक्षराज्याच्या यज्ञ मंडपात आली .

     यज्ञ मंडपात सर्व देव आणि ऋषीमुनींना सन्मानाने बसवलेले होते . भवानी , जगदंबा म्हणजेच पार्वतीला आलेले बघून सर्व देवलोक आणि ऋषी मुनी यांना खूप आनंद झाला ते खूप प्रसन्न झाले व त्यांनी पार्वतीला वंदन केले .

     त्या नंतर नंदीवरून उतरून पार्वती पित्याकडे (दक्षराजा) कडे गेली . परंतु त्यांनी तिच्याकडे बघितले सुद्धा नाही . जगदमाता पार्वतीने पित्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तिला वाटले यज्ञाच्या धुराने पित्याचे डोळे भरले म्हणून त्यांनी आपल्याकडे बघितले नसेल .

     म्हणून ती पुढे आपल्या बहिणींकडे गेली . त्या सर्व बहिणींना दक्ष राजाने सन्मानित केले होते . परंतु त्या बहिणींनी सुद्धा पार्वती कडे बघितले नाही व काही बोलल्या सुद्धा नाहीत . त्याच प्रमाणे आई सुद्धा बोलली नाही हे सगळे बघून पार्वतीचे मन कडू झाले .

     (दक्षप्रजापती ) पार्वतीचे वडील तिच्याकडे बघून म्हणाले हि कशाला आली . इथे हिला कोणी बोलावले , कन्या पार्वती आणि जावई शिव मला माझ्या डोळयासमोर नकोयेत.असे बोलून अनंत ब्रह्मांडाची स्वामींनी पार्वतीचा अपमान तिच्या वडिलांनी केला .

     या अपमानाने त्या खूप क्रोधीत झाल्या आणि या आदिमाया अपर्णा देवी पार्वती आकाशातून वीज अकस्मात पणे धर्तीवर पडावी त्याच प्रमाणे पार्वती यांनी त्या धगधगत्या यज्ञ कुंडात उडी घेतली . व स्वतःला संपवले .

     पुढे हिमालय पर्वताच्या उदरी ,त्रिपुर सुंदरीने अवतार घेऊन हि आदिमाया अंबिका पार्वती हिमालय पर्वताची कन्या झाली . त्या एवढ्या सुंदर होत्या कि पूर्ण ब्रह्मांडात त्यांच्या सारखी सुंदर कन्या नव्हती .

     अष्टविनायकाच्या सौंदर्याला तिच्या पायाच्या अंगठ्याचे नख याची सुद्धा सर नव्हती . तिच्या सुंदरतेचे वर्णन करण्याची शेषालाही शक्ती नव्हती . तिच्या लावण्य प्रतिमेत संपूर्ण सृष्टीचे वर्णन झाले होते .

     तिच्या कुंकवाच्या तेजापुढे सूर्याच्या लाल ताम्बळे किरणे हि नम्र झाले होते . एवढी सुंदर हिमालय पर्वताची हि कन्या होती . पिता हिमालय याने तिचा विवाह करण्याचे ठरविले आपली विश्वसुंदरी कन्या श्री विष्णूस द्यावी असे त्यांना नारदमुनी यांनी सुचविले . हिमालयाला वाटले विष्णूच हा आपल्या मुलींसाठी योग्य वर आहे . व त्याने पार्वतीला हि गोष्ट सांगितली .

    तेव्हा पार्वती म्हणाली त्रैलोक्याचे अधिपती म्हणजे महादेव हेच माहे पती व्हावे हि माझी इच्छा आहे . आणि तेच माझे जन्मोजन्मीचे पती आहेत आणि मी त्यांच्याशीच लग्न करेल असे पार्वती म्हणाली.

     मी मनातून महादेवालाचं आपले पती मानले असून मी त्यांनाच वर्णार असे सांगून पार्वती मैत्रिणीला ,सखीला घेऊन वनात (जंगलात) निघून गेली .

     अरण्यात गेली असता पार्वतीने नदीकाठी शिवलिंगाची स्थापना केली .व आपल्या मैत्रिणीला बरोबर घेऊन तिने वनात राहून शिवलिंगाची मनोभावे पूजा करून कडक उपवास करत शिवाची पूजा केली.

--By-poonam m.
-------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीफेस्टिवल.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================