हरितालिका-माहिती-7-A

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:11:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "हरितालिका"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरितालिकेवर महत्त्वाची माहिती.

            मुख्य हरतालिका पूजा | hartalika puja in marathi--

     सर्व प्रथम नदीतील वाळू घेऊन ती ओली करावी , आणि नंतर त्या वाळूचे चौरंगावर शिवलिंग स्थापन करावे . त्यानंतर देवीच्या मूर्तीवर शुद्ध पाणी घेऊन त्या पाण्यात गंध टाकावा व ते पाणी फुलाने देवीच्या मूर्तीवर शिंपडावे .

     त्या नंतर पंचामृतात एकफुल किंवा दुर्वा बुडवून ते देवीवर वाहावे . सौरभ्यम महादिव्यम पवित्रंमं पुष्टिवर्धनाम दुग्धमं गृहिष्ट्म नमः समर्पयामि . असे म्हणावे त्या नंतर देवीच्या मूर्तीला हळद कुंकू अक्षदा असे वाहावे . कुंकुममं समर्पयामि असे म्हणावे .

     त्या नंतर अगरबत्ती आणि निरंजन (दिवा ) ओवाळावे आणि घंटा वाजवावी . दीपम दर्शयामी असे म्हणावे. आता पंचामृताचा नैवद्य दाखवावे आणि त्या भोवती २ वेळा पाणी फिरवावे. नैवेद्यार्थे पंचामृत शेष नैवेद्यंम समर्पयामि असे म्हणावे . त्या नंतर एक फुल गंधामध्ये बुडवून देवीला वाहावे . देवी समोरच्या एका विड्यावर आणि एका फळावर पळीने पाणी वाहावे . यानंतर एका फुलाने अत्तर घ्यावे आणि ते देवीला वाहावे .

     त्यानंतर देवीला कापसाची वस्रे वाहावी आणि कापसाची नसल्यास कापडाची वाहावी . शंकराला जानवे वाहावे . त्यानंतर गंध आणि अक्षदा वाहाव्यात . देवीला हळदकुंकू बुक्का वाहावे . कुंकुममं समर्पयामि असे म्हणावे . या नंतर देवीला बांगड्या , गळसरी , पंचुकी , तालपत्र व आदी अलंकार वाहावीत . सौभाग्य अलंकार वाहावीत .

     आता राहिलेली सुवासिक फुले ,बेल पत्रे देवीला वाहावी . आता देवीची अंग पूजा करायची आहे त्यासाठी अक्षदा घ्यावीत आणि ती देवीच्या सर्व अंगावर थोडीथोडी वाहावीत . सच्चीदानंद उपिनने नमः सर्वांगेय पुजेयामी ,पत्रपूजनं समर्पयामि असे म्हणावे आणि उरलेली जी पत्री म्हणजे झाडांची पाने ती सर्व एक एक करून देवीला वाहावीत .

     सर्वेश्वर नमः नानाविविध पत्र समर्पयामि असे म्हणावे . त्यानंतर पुष्पपूजा म्हणजे सर्व प्रकारची फुले देवीला वाहावीत . त्यानंतर देवीची नाम पूजा करावी देवीच्या प्रत्येक नावाला नमस्कार करावा .

     उमाये नमः , गौरीये नमः ,कल्याई नमः ,शिवाय नमः ,भावनिये नमः , सर्व मंगलाई नामहः , अपर्णाय नमः ,पार्वतेय नमः , दुर्गाये नमः , चामुंडये नमः, शारदायी नमः , चण्डिकायें नमः,अम्बिकाये नमः असे म्हणून .आता हातात अगरबत्ती घेऊन ओवाळावी त्यानंतर निरंजन ओवाळावे आणि घंटा वाजवावी .

     आता नैवद्य साठी हाताने पाण्याचा चौकोन करून त्यावर दूध किंवा कोणतेही फळ ठेवावे, आणि त्या नैवेद्याला पाणी फिरवावे . आणि त्या नंतर हात जोडावे .

     आणि नमस्कार करावा . त्यानंतर कळावती पेटवाव्यात आणि त्याचा बरोबर एका हाताने घंटा वाजवावी . श्री उमामहेश्वर अध्ययन नमः , दीपम दर्शन नमामि असे म्हणावे आणि एका वाटीत कपूर लावून तो ओवाळावे .

     आता स्वतः उभे राहावे आणि हातामध्ये गंध ,अक्षदा, फुल घ्यावे आणि देवीच्या चौरंग भोवती किंवा स्वतः भोवती १ किंवा ३ प्रदक्षिणा घालाव्यात . त्यानंतर हातातील फुल्ल अक्षदा देवीला वाहवीत . देवीला वाकून नमस्कार करावा . नमस्कारम समर्पयामि असे म्हणावे . त्या नंतर पुन्हा खाली बसून पुढील विधी करावी.

     आता वाणाचे दान करायचे आहे , सूपा मध्ये सर्व वाणाच्या वस्तू त्या ठेवाव्यात त्यावर १ तुळशी पान ठेवावे आणि संकल्प करावा . आणि म्हणावे मम ,आत्मानं ,सखल शास्त्र ,पुराणयुक्त , फलप्राप्त्यर्थम , हरतालिका ,व्रतपूजा सांगता सिध्यर्थम ,ब्राम्हणायाम वायनप्रदायाम निराशेत , ब्रह्मन् पूजन निराशेत त्या नंतर सौभाग्य अलंकाराला गंध अक्षदा फुल वाहून नमस्कार करावा .

     पूजा करून झाल्यानंतर हरतालिका देवीची आरती म्हणावी आणि घंटा नाद करावा त्याचबरोबर तुपाची आरती ओवाळावी . आरती तोंडी पाठ नसेल तर खाली दिलेली आरती म्हणावी.

--By-poonam m.
-------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीफेस्टिवल.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================