हरितालिका-माहिती-7-B

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:13:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "हरितालिका"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरितालिकेवर महत्त्वाची माहिती.

     त्या नंतर हे वाण आनि दक्षिणा गुरुजींना द्यावीत . त्या नंतर शंकराच्या पिंडीवर १०१ किंवा १५१ बेल पान एक एक करत पाण्यात बुडवून ओम नमः शिवाय असे म्हणून एक एक बेलाचे पान पिंडावर वाहावीत.या ठिकाणी हरतालिकेची सुफळ , संपूर्ण पूजा झाली .

     अश्या प्रकारे How to do hartalika pooja at home in Marathi? घरच्या घरी हरतालिकेची विधीवर पूजा आपण बघितली आणि भक्ती भावाने हि hartalika pooja किंवा (Hariyali Teej) पूजा आपण करू शकतो .

          How to do hartalika fast in Marathi? हरतालिकेचा उपवास कसा करावा ?--

     पार्वतीने हरतालिकेचा उपवास व व्रत हे अरण्यात राहून पूर्ण केले होते . त्यामुळे पार्वती ने हा उपवास खूप कडक रीतीने केला होता . अरण्यात असल्यामुळे आणि कडक उपवास असल्यामुळे पार्वतीने ह्या उपवासाच्या वेळेस अरण्यातील पाने आणि फळे व कंद मुळे खाऊन केला .

     हा उपवास करतांना बायकांनी सुद्धा पार्वती सारखे फळे खाऊन हा उपवास करावा . ह्या उपवासाच्या दिवशी तिखट पदार्थ किंवा मीठ घातलेले पदार्थ शक्यतोवर खाऊ नयेत . हा उपवास करत असतांना फक्त फळे किंवा गोड पदार्थाचे सेवन केले जाते आणि ते गोड़ पदार्थ हे उपवासाचेच असले पाहिजेत , जसे कि रताळू काप किंवा रताळूची खीर किंवा गोड़ साबुदाणा खीर असे पदार्थ खाऊ शकतात .

     परंतु जो पर्यंत हरतालिकेची पूजा होत नाही तोवर बायका काहीच खाऊ नाही शकत . तो पर्यंत फक्त दूध पिऊ शकतो. एकदा का पूजा पूर्ण झाली कि मगच फळाहार ( फळे किंवा कंदमुळे ) खाऊ शकतो . अश्या प्रकारे हा हरतालिकेचा उपवास hartalika fast केला जातो .

--By-poonam m.
-------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीफेस्टिवल.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================