हरतालिका आरती

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:22:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "हरितालिका"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरतालिका आरती.

            हरतालिका आरती (Hartalika Aarti) –

जय देवी हरितालिके।
सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओवाळीते ।
ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥

हर अर्धांगी वससी ।
जासी यज्ञा माहेरासी ॥
तेथे अपमान पावसी ।
यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. १ ॥

रिघसी हिमाद्रिच्या पोटी ।
कन्या होसी तूं गोमटी ॥
उग्र तपश्चर्या मोठी।
आचरसी उठाउठी ॥ जय.॥ २ ॥

तपपंचाग्निसाधने ।
धुम्रपाने अघोवदने ।
केली बहु उपोषणे ॥
शुंभ भ्रताराकारणें ॥जय. ॥ ३ ॥

लीला दाखविसी दृष्टी ।
हे व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी ।
मज रक्षावे संकटी ॥ जय. ॥ ४ ॥

काय वर्णू तव गुण ।
अल्पमती नारायण ॥
माते दाखवी चरण ।
चुकवावे जन्म मरण ॥ जय देवी ॥ ५ ॥

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================