हरितालिका-माहिती-13

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:25:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "हरितालिका"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरितालिकेवर महत्त्वाची माहिती.

             हरतालिका मंत्र –

     या व्रताचे महत्त्व फार मोठे आहे. हे व्रत केल्याने माता पार्वती आणि भगवान शंकर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पतीला दीर्घायुष्य, कीर्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. हा आहे शुभ मंत्र...

               भगवान शिवाला प्रसन्न करणारे मंत्र –

ओम नमः शिवाय:|
ओम हराय नमः ।
ॐ महेश्वराय नमः ।
ओम शांभवे नमः ।
ॐ शुल्पणये नमः ।
ॐ पिनकवृषे नमः ।
ॐ पशुपतये नमः ।

               माता पार्वतीला प्रसन्न करणारे मंत्र –

ओम शिवाय नमः ।
ओम उमाये नमः ।
ॐ पार्वत्याय नमः ।
ओम जगद्धात्राय नमः ।
ॐ जगत्प्रतिष्ठायै नमः ।
ओम शांतीरुपण्य नमः ।

                 FAQ –

--हरितालिका कधी आहे?
--18 सप्टेंबर 2023 सोमवार या दिवशी हरितालिका आहे.

--हरितालिका म्हणजे काय?
--हरिता म्हणजे हरण करणारी आणि लिका म्हणजे सखी. हरितालिका हे पार्वतीचे नाव आहे जिने भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी हे व्रत केले होते.

--हरितालिकेचे व्रत का करतात?
--कुमारीका आपल्याला योग्य जोडीदार मिळावा यासाठी आणि सुवासिनी स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात.

--हरितालिकेचा उपवास कसा करावा?
--हरितालिकेचा उपवास हा निर्जळी करावा आणि फक्त फलाहार करावा कोणताही पदार्थ खाऊ नये.

--हरितालिकेचे व्रत कोणी करावे?
--हरितालिकेचे व्रत कुमारिका आणि सुवासिनी स्त्रियांनी करावे.

             निष्कर्ष : Conclusion –

     मित्रांनो, आज मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे आम्ही हरतालिका व्रत ,व्रताचा इतिहास,महत्त्व तसेच हे व्रत कसे करावे? याबाबतची माहिती आपल्यापर्यंत पोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================