हरितालिका-शुभेच्छा संदेश-6

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:58:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "हरितालिका"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरतालिका शुभेच्छा संदेश.

         हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!--

=========================================
हरतालिकेची मनोभावे पूजा करुन
मिळावा आवडीचा जोडीदार,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

सौभाग्याची देणं आहे हरतालिका,
मनोभावे पूजा करुन सुयोग्य वर मिळवा,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

अखंड सौभाग्याचे प्रतीक,
हरतालिका पूजन,
चला करुया साजरा हा दिवस
हरतालिकेच्या शुभेच्छा!

देवी पार्वती तुमच्या आयुष्यात आणो सुख आणि शांती
सर्वांना मिळू दे सुयोग्य पती
हरतालिकेच्या शुभेच्छा!

हरतालिकेचे व्रत करुन तुमच्या आयुष्यात
येवो आनंदी आनंद
हरतालिका शुभेच्छा!

वातावरणात गारवा आहे,
आनंदी आनंद झाला आहे,
हरतालिकेच्या या दिवशी,
प्रेमाचा दिवस आला आहे,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

संकल्प शक्तीचे प्रतीक,
सौभाग्य कामनेचे व्रत,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

आला रे आाला हरतालिकेचा सण आला,
करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!

आनंद हरतालिकेचा  मनी हा दाटला,
आला सण मांगल्याचा आणि पवित्र अशा हरतालिकेचा
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!

हरतालिका आणू दे जीवनात आमच्या आनंद
तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा!
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.वेबदुनिया.कॉम)
                    ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================