हरितालिका-शुभेच्छा संदेश-7

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:59:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "हरितालिका"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरतालिका शुभेच्छा संदेश.

           हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!--

=========================================
माता पार्वतीने केले हरतालिका व्रत
म्हणून तिला मिळाले पती स्वरुप शंकर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

हरतालिकेचा आनंद येऊ देत तुमच्या जीवनात नव चैतन्य
सदैव तुम्हाला मिळो आनंदी आनंद

पार्वतीप्रमाणे व्रत करुन मिळवा
तुमच्या जीवनात आनंदी आनंद
दरवर्षी करा हरतालिका व्रत हे मनोभावे
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!

पार्वतीने केले हरतालिका व्रत मिळावा
तुम्हालाही उमा शंकर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

आनंदी आनंद आला,
हरतालिकेचा सण हा आला,
मिळू दे तुम्हाला पती हा शंकरासारखा
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!

आनंदाचा क्षण हा आला,
हरतालिकेचा क्षण हा आला,
करा मनोभावे पूजा हरतालिकेची
सगळ्यांना मिळू दे मनोभावे पती,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

हरतालिकेचा आनंद घेऊन येवो तुमच्या जीवनात आनंदी आनंद
करा आज तुम्ही मनोभावे पूजन
हरतालिकेच्या शुभेच्छा!

हरतालिका पूजन करुन येऊ देत
जीवनात आनदी आनंद
मिळावा पती शंकरासमान भोळा सुंदर
हरतालिकेच्या शुभेच्छा!

शंकराची मनोभावे पूजा करुन,
हरतालिका पुजूया,
हरतालिका शुभेच्छा

माता पार्वतीने केले मनोभावे हरतालिकेचे व्रत,
म्हणून तिला मिळाले शंकर नावाचे वर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
=========================================

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.वेबदुनिया.कॉम)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================