हरितालिका-शुभेच्छा संदेश-27

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 07:28:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "हरितालिका"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरतालिका शुभेच्छा संदेश.

     हरितालिके दिवशी उमा शंकराचे पूजन केले जाते. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि आलि म्हणजे सखी. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला 'हरितालिका' असे म्हणतात. हरितालिकेच्या पूजेसाठी पार्वती आणि तिची सखीयांच्या मातीच्या मुर्ती आणि शंकराची पिंड यांची पूजा केली जाते . या दिवशी कडक उपवास केला जातो. काही महिला निर्जळी उपवास देखील करतात.

     कुमारिका हरतालिकेची मनोभावे पूजा करुन सुयोग्य पती मिळवण्यासाठी हे व्रत करतात. हे व्रत करताना एकमेकांना हरतालिका शुभेच्छा (Hartalika Chya Shubhechha) दिल्या तर व्रत करण्याची प्रेरणा नक्कीच मिळते.

         हरतालिका शुभेच्छा संदेश--

=========================================
माता उमाला मिळाला जसा शिव वर

तुम्हालाही मिळो मनाजोगता वर

करिती व्रत सवाष्ण वा कन्या

उपवर अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर,

हरतालिकेच्या शुभेच्छा!


करुनी मनोभावे पूजा शंकराची,

प्रसन्न करावे त्याला

हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा!


हे गौरी शंकरार्धांगी।

यथा त्वं शंकर प्रिया तथा मां कुरु कल्याणी,

कान्त कान्तां सुदुर्लभाम्।।

हरतालिका तीज च्या शुभेच्छा
=========================================

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-डिजिटल टेक्नो डायरी.कॉम)
                 ---------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================