श्रीगणेश चतुर्थी-माहिती-7

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 10:58:05 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "श्रीगणेश चतुर्थी"
                                     ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थीवर महत्त्वाची माहिती.

             गणेश चतुर्थीचा इतिहास--

     शिव पुराणातील कथेनुसार देवी पार्वतीचा पुत्र गणेशाचा जन्म या गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला होता. म्हणून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते.

     एके दिवशी देवी पार्वती स्नानासाठी जात असताना तिने चन्दनापासून निर्मित अश्या बालकाला द्वारपाल म्हणून नेमले. जेव्हा ती स्नान करत होती त्यावेळी श्री भगवान शंकर तिथे आले. त्यावेळी या बालकाने प्रभू शिवांना रोखले आणि दोघांमध्ये वाद झाला.

     पार्वतीचा एक आज्ञाधारक मुलगा असल्याने, या बालकाने आपल्या आईच्या आज्ञेचा आदर केला आणि भगवान शिवाला सभागृहात प्रवेश दिला नाही. यामुळे भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी या बालकाचे मस्तक शरीरापासून वेगळे केले. हे पाहिल्यानंतर देवी पार्वतीने काली अवतारात धारण करून, क्रोधाने विश्वाचा नाश करण्याची धमकी दिली. त्यामुळे सर्व देवी देवता त्यांची प्रार्थना करून क्षमा मागू लागले.

     त्यावेळी देवी पार्वती शांत झाल्या आणि पुत्राला पुनर्जीवित करावे, आणि त्या पुत्राला सर्वात उच्च स्थान दिले जावे अशी मागणी महादेवांकडे केली. महादेव देवी पार्वती यांच्या मागणीला होकार देऊन आपल्या गणांना आदेश दिला की, पृथ्वीतलावर जा आणि सगळ्यात आधी तुम्हाला जो प्राणी दिसून येईल त्याचे शीर कापून घेऊन या. गण पृथ्वीतलावर गेले त्यावेळी त्यांना सर्वप्रथम हत्ती हा प्राणी दिसून आला. मग त्या हत्तीचे शीर कापून घेऊन महादेवासमोर हजर झाले. तेच हत्तीचे शीर महादेव यांनी त्या पुत्राच्या धडावर लावले. आणि त्या पुत्राला पुनर्जीवित केले.

     यानंतर महादेव, पार्वती यांनी त्याचा स्वपुत्र म्हणून स्वीकार केला. गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे मूख या दोघांचा मिळून गजानन असा अर्थ होतो. त्याचप्रमाणे महादेवाने या पुत्राला गणांचा देव म्हणून गणेशाचे नाव प्रदान केले आहे. हे सगळे प्रकार घडले तो दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा होता. म्हणून या दिवसापासून गणेश चतुर्थीला महत्त्व प्राप्त झाले असून आपण हा दिवस मोठ्याने आनंदात साजरा करतो.

              गणेश चतुर्थीचे महत्त्व--

     गणेश चतुर्थी हा हिंदूंसाठी भगवान गणेशाचा जन्म साजरा करण्याची आणि बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्यासाठी त्यांचे आशीर्वाद मिळविण्याची वेळ आहे. हा सण कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी एकत्र येण्याचा आणि साजरा करण्याचा एक काळ आहे.

     हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान असतो. कोणत्याही कार्य असल्यावर सर्वात आधी भगवान गणेशाची पूजा केली जाते. संकटाचा नाश करणारा, अडथळे दूर करणारा आणि आनंदी वातावरण निर्माण करणारा असा हा विघ्नहर्ता, गणपती म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते.

=========================================
गणेश चतुर्थी 2023 प्रारंभ तारीख –मंगळवार, 19 सप्टेंबर 2023
गणेश चतुर्थी 2023 शेवटची तारीख –गुरुवार, सप्टेंबर 28, 2023
मध्यान्ह गणेशपूजेचा मुहूर्त –11:01 AM ते दुपारी 01:28
कालावधी –02 तास 27 मि
गणेश चतुर्थी तिथी सुरू –18 सप्टेंबर, दुपारी 12:39 वाजता
गणेश चतुर्थी तिथी समाप्त –19 सप्टेंबर, दुपारी 1:43 वाजता
चंद्रदर्शन टाळण्यासाठी आदल्या दिवशीची वेळ –18 सप्टेंबर दुपारी 12:39 ते रात्री 08:10
कालावधी –07 तास 32 मि.
चंद्रदर्शन टाळण्याची वेळ –सकाळी 09:45 ते 08:44 PM
कालावधी –10 तास 59 मि.
गणेश विसर्जन 2023 कधी आहे? –गुरुवार, सप्टेंबर 28, 2023
=========================================

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                      --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================